मुंबईत मॅक्रॉनविरोधातील पत्रके हटवली

मुंबईत मॅक्रॉनविरोधातील पत्रके हटवली

मुंबईः फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निषेध करणारी रस्त्यावर चिटकवलेली पत्रके दक्षिण मुंबईत गुरुवारी पाहावयास मिळाली. पण पोलिसांनी हस्तक्षेप करून ही पत्रके लगेचच काढून टाकली.

दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार भाग, जेजे उड्डाण पुलाखाली मोहम्मद अली मार्गावर मॅक्रॉन यांचा निषेध करणारी शेकडो पत्रके चिटकवलेली गुरुवारी संध्याकाळी दिसून आली. त्या संदर्भातील काही व्हीडिओ सोशल मीडियात पसरले. एका व्हीडिओत पादचारी, मोटार सायकली, चार चाकी वाहने मॅक्रॉन यांच्या निषेधाच्या पत्रकावरून जाताना दिसत होत्या. पण पायधुनी पोलिस ठाण्यातील कार्यरत पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन रस्त्यावर चिटकवलेली पत्रके काढली. या संदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

मूळ बातमी

COMMENTS