प्रज्ञा सिंह ठाकूर संरक्षण सल्लागार समितीवर

प्रज्ञा सिंह ठाकूर संरक्षण सल्लागार समितीवर

नवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी व सध्या जामीनावर सुटलेल्या भाजपच्या भोपाळमधील खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संसदेच्या संरक्षण सल्लाग

जॉन ल कॅरी – रहस्यमय आणि पतित जगाचा लेखक
हवालदारांचा पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मार्ग मोकळा
लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी

नवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी व सध्या जामीनावर सुटलेल्या भाजपच्या भोपाळमधील खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संसदेच्या संरक्षण सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीवर अन्य २१ सदस्य असून या समितीचे अध्यक्ष केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आहेत.

काँग्रेसने या नियुक्तीवर आक्षेप घेत प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नियुक्तीमुळे देशाच्या सैन्यदलाचा व प्रत्येक नागरिकाचा अपमान झाल्याचा आरोप केला आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांना प्रकृतीच्या कारणावरून एप्रिल २०१७मध्ये जामीन मिळाला होता. त्यानंतर भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना भोपाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंग यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत प्रज्ञा सिंह ठाकूर तीन लाखापेक्षा अधिक मताने निवडून आल्या होत्या.

एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म. गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणून संबोधले होते. त्यावर देशभर संताप व्यक्त झाला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘ गांधी, गोडसेंबाबत ज्या काही चर्चा सुरू झाल्यात, जी काही विधाने केली गेली आहेत ती अत्यंत बेजबाबदार, घृणास्पद व टीकेच्या लायकीची असून सभ्य समाजात अशी भाषा चालत नाही. अशी मानसिकता समाजात चालू शकत नाही. यापुढे अशी विधाने करण्याअगोदर शंभरवेळा विचार करण्याची गरज आहे. त्यांनी जरी माफी मागितली असली तरी त्यांना मी मनापासून माफ केलेले नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

मोदींच्या या प्रतिक्रियेनंतर भाजपने प्रज्ञा सिंह यांना पक्षाच्या शिस्तपालन समितीकडून नोटीस पाठवली होती. पण त्यांच्यावर काय कारवाई झाली हे अद्याप उघडकीस आलेले नाही.

केवळ प्रज्ञा सिंहच नव्हे भाजपच्या अनेक नेत्यांकडून गोडसेंची प्रशंसा करण्याची चढाओढ सुरू असते आणि त्यावर भाजप कोणतीही कारवाई करत नाही, असा सिद्ध करणारा एक लेख द वायरने प्रसिद्ध केला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: