एमआयएम नाही पण काँग्रेससोबत जाऊः प्रकाश आंबेडकर

एमआयएम नाही पण काँग्रेससोबत जाऊः प्रकाश आंबेडकर

मुंबईः आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये आम्ही काँग्रेसशी युती करण्यास तयार असल्याचे पण एआयएमआयएमशी आघाडी करणार नसल्याचे स

राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार डळमळीत
चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन का दिला?
देगलूर पोटनिवडणूकः काँग्रेसचे अंतापूरकर विजयी

मुंबईः आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये आम्ही काँग्रेसशी युती करण्यास तयार असल्याचे पण एआयएमआयएमशी आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे केले. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आंबेडकर म्हणाले, काँग्रेससोबत युती करण्यासाठी आमची कोणतीही अट नाही. आमचे राजकारण सत्तेच्या समीकरणासाठी नाही तर भाजप-संघपरिवारासारख्या उजव्या कट्टरवादी विचारसरणीच्या पक्षांना राजकारणापासून रोखण्याचे आहे. समाजात फूट पाडणाऱ्यांच्या विरोधातले आहे. धर्मांध व विद्वेषयुक्त विचारसरणीला विरोध करण्याचे आहे, असे ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकर सध्या राज्याचा दौरा करत असून या दौऱ्यात ते समविचारी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसशी आम्ही आघाडी करण्याची तयारी दाखवत आहोत पण त्यांनी आम्हाला समान स्तराचा मान द्यावा. गेल्या विधानसभा निवडणुकात वंचित आघाडीने अव्वाच्या सव्वा जागा मागितल्या म्हणून काँग्रेससोबत आघाडी झाली नाही हा खोडसाळपणे केलेला प्रचार होता. आम्ही योग्य जागा मागितल्या होत्या. आता राजकारण पुढे नेण्याची वेळ आली आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेत राज्यघटना वाचवण्याची वेळ आली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आमचा पक्ष समविचारी पक्षांशी सौहार्दाचे संबंध स्थापन इच्छितो, आम्ही समाजातील वंचित, पददलित, कष्टकरी, मागास जातींच्या सबलीकरणासाठी प्रयत्नशील आहोत, त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी राजकारण करणारे आहोत. महाराष्ट्रात मराठा समाजाकडे सत्ता आहे पण त्या सत्तेचा लाभ काही घराण्यांनी घेतला. राज्यातील ४० टक्के मराठा समाज सधन आहे पण उरलेला समाज गरीब, आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे. अशा दुर्लक्षित समाजाला अनेक वर्ष नाकारले केले आहे, त्यांना राजकीय प्रवाहात स्थान मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 

 

 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: