सर्वोच्च न्यायालय अवमानप्रकरणी भूषण यांना १ रु.चा दंड

सर्वोच्च न्यायालय अवमानप्रकरणी भूषण यांना १ रु.चा दंड

नवी दिल्लीः दोन ट्विटच्या माध्यमातून आपला अवमान केल्याप्रकरणातील दोषी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने एक रुपयाचा दंड ठ

कुणाल कामरांवर बेअदबी कारवाईस परवानगी
माफी मागणार नाही; भूषण निर्णयावर ठाम
‘मला माफी नकोय, कोणतीही शिक्षा द्या’

नवी दिल्लीः दोन ट्विटच्या माध्यमातून आपला अवमान केल्याप्रकरणातील दोषी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास त्यांना तीन महिन्यासाठी तुरुंगात जावे लागेल किंवा त्यांना ३ वर्षे वकिली करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

आपला निर्णय जाहीर करताना न्या. अरुण मिश्रा, न्या. गवई व न्या. मुरारी यांच्या पीठाने सांगितले की, न्यायाधीशांनी प्रसारमाध्यमांपुढे जाण्याची गरज नाही, त्यांच्या न्यायालयाबाहेरील विधानांवर अवलंबून राहू नये. न्यायालयाने पुढे म्हटले की, न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणात भूषण यांनी माफी मागावी यासाठी त्यांना अनेक संधी दिल्या. पण त्यांनी आपल्या विधानावर ठामपणे राहण्याचा निर्णय घेतला. भूषण यांनी हे प्रकरण प्रसार माध्यमात नेल्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. प्रसार माध्यमातून व्यक्त झालेली मते न्यायालयाच्या निर्णयाची जागा घेऊ शकत नाहीत. भूषण यांच्या ट्विटमुळे न्यायालयाला वेदना व दुःख झाल्या, असे या तिघा न्यायमूर्तींच्या पीठाने स्पष्ट केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: