‘सरन्यायाधीशांवरील टीकेने अवमान होत नाही’

‘सरन्यायाधीशांवरील टीकेने अवमान होत नाही’

नवी दिल्लीः आपला अवमान केल्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी त्यांचे उत्तर रविवारी न्यायालयात सादर

शेफाली वैद्य : बेअदबीची परवानगी नाकारली
‘मला माफी नकोय, कोणतीही शिक्षा द्या’
शासनाचे खरे लक्ष्य प्रशांत भूषण नव्हे तर पारदर्शी न्यायसंस्था होय !

नवी दिल्लीः आपला अवमान केल्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी त्यांचे उत्तर रविवारी न्यायालयात सादर केले. या उत्तरात त्यांनी देशाच्या सरन्यायाधीशांवरची टीका ही सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी नाही पण या न्यायालयाचे ते अधिकारही कमी करत नाहीत असे स्पष्ट करत सरन्यायाधीश म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय म्हणजे सरन्यायाधीश असे मानणे हे ही संस्था कमकुवत करण्यासारखे आहे, असे म्हटले आहे.

मोटार सायकलवर सरन्यायाधीशांनी बसण्यामागे माझी खंत होती की गेल्या तीन महिन्यात न्यायालयात फारच कमी प्रकरणांची सुनावणी झाली. त्या उद्वेगातून ट्विट केले गेले. पण माझे म्हणणे पूर्वीच्या ४ सरन्यायाधीशांच्या कामासंदर्भात होते. त्यांनी देशातील लोकशाही नष्ट करण्यास अनुमती दिली. देशातल्या कार्यकारी मंडळावर अंकुश आणण्याचे काम न्यायालय करू शकले नाही. न्यायालयाने पारदर्शीपणा व उत्तरदायित्वाची भूमिका पार पाडणे हे महत्त्वाचे आहे पण या सरन्यायाधीशांनी लोकशाही कमकुवत करण्यामध्ये मोठी भूमिका बजावली असे माझे मत असून या मतस्वातंत्र्याने अवमान केला असे मानता येणार नाही. मतस्वातंत्र्य व टीकेचा अधिकार हा न्यायव्यवस्थेला अधिक निष्पक्ष व मजबूत करत असतो, त्यातून न्यायालयाचा अवमान होतो किंवा तिची प्रतिष्ठा कमी होत नसते, असे भूषण म्हणाले.

प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीशांसंदर्भात ट्विट केल्यानंतर २००९मधील प्रशांत भूषण यांच्याविरोधातील न्यायालयाचा अवमान केलेला एक खटला सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस घेतला. या खटल्याची सुनावणी ८ वर्षांनंतर ४ ऑगस्टला सुरू होत आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: