हिंसाचारानंतर अलाहाबादमध्ये आफरीनच्या घरावर बुलडोझर

हिंसाचारानंतर अलाहाबादमध्ये आफरीनच्या घरावर बुलडोझर

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहरात रविवारी (१२ जून) दुपारी प्रशासनाने वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्या आणि कार्यकर्त्या आफरीन फातिमा यांच

गॉसिपिंगच्या अलीकडे.. पलीकडे…
भाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’
तेलतुंबडेंच्या बचावासाठी उभे राहणे अत्यावश्यक का आहे?

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहरात रविवारी (१२ जून) दुपारी प्रशासनाने वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्या आणि कार्यकर्त्या आफरीन फातिमा यांचे वडील जावेद मोहम्मद यांचे घर पाडण्यास सुरुवात केली.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना, दुपारी दोन जेसीबी बुलडोझर जावेद मोहम्मद यांच्या कारली येथील निवासस्थानी पोहोचले. पुढचे आणि मागील दरवाजे बुलडोझरने पाडल्यानंतर, घरात ठेवलेले वैयक्तिक सामान काढून टाकण्यात आले आणि फातिमाच्या राहत्या घराशेजारील रिकाम्या प्लॉटवर टाकण्यात आले.

सध्या त्यांच्या घराच्या भिंती पाडल्या जात आहेत.

१० जून रोजी, भाजपचे निलंबित नेते नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अलाहाबादमध्ये झालेल्या निदर्शनाला हिंसक वळण लागले. हिंसाचाराच्या संदर्भात आंदोलकांवर कारवाई करत उत्तर प्रदेश पोलिसांनी ६० हून अधिक लोकांना अटक केली आहे.

वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि सीएए विरोधी निदर्शनातील प्रमुख चेहरा जावेद मोहम्मद यांच्यावर यूपी पोलिसांनी इतर १० जणांसह मुख्य सूत्रधार म्हणून आरोप ठेवला आहे.

१० जून रोजी त्यांना कारली येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच दिवशी त्याच्या पत्नी आणि मुलीलाही ताब्यात घेण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

जावेद मोहम्मदने १० जून रोजी आंदोलनाची हाक दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.

यानंतर ११ जून रोजी त्यांचे राहते घर पाडण्याची नोटीस कुटुंबीयांना देण्यात आली, त्यानंतर कुटुंबातील अनेक महिला सध्या घरात राहत असल्याने पोलीस या कुटुंबाला त्यांचे घर सोडण्यासाठी सांगत असल्याची माहिती आहे. .

याआधी आफरीन फातिमाचा भाऊ मोहम्मद उमाम जावेद याने ‘द वायर’ला सांगितले होते की, पोलिसांची एक टीम त्याच्या घरी पोहोचली होती आणि कुटुंबाला “बुलडोझर कारवाई’ची धमकी दिली होती.

त्यांनी सांगितले, “११ जूनला रात्री पुन्हा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची टीम आमच्याकडे आली. त्यांनी आम्हाला दम दिला आणि ताबडतोब घर सोडण्यास् सांगितले. आम्हाला सांगण्यात आले आहे की ते आमचे घर रिकामे करण्यासाठी दुपारी २ वाजता परत येतील.”

त्यांना दिलेल्या नोटीशीमध्ये घराचे बांधकाम बेकायदा असल्याचे नमूद करण्यात आले असून त्यात लिहिले आहे की, ‘कुटुंबाला १० मे रोजी नोटीस पाठवली होती आणि २४ मे रोजी त्यावर सुनावणी होणार होती, मात्र कुटुंबाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

यापूर्वी, विद्यार्थी कार्यकर्त्या आफरीन फातिमाने सोशल मीडियावर एक अपील केले होते, ज्यामध्ये तिने राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहून तिच्या वडिलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली होती.

तत्पूर्वी, ‘द वायर’शी बोलताना आफरीन फातिमा म्हणाली, की हिंसाचाराच्या दोन दिवस आधी तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम १०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0