कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर क

रो विरुद्ध वेड
‘अंबानी व संघाशी संबंधिताकडून ३०० कोटींची लाच’
हिंदी साहित्याला पुढे आणण्यासाठी सतत प्रयत्नांची गरज – गीतांजली श्री

मुंबई : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर कोकणातल्या अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. तसेच जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत आहे.

या पावसाचा जोर पुढे ८ जुलैपर्यंत कोकणासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत कायम राहील. येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे.

त्याच बरोबर येत्या ८ जुलैपर्यंत उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच ५ जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात ३०-४० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळ वारा व विजेच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस तर ६ व ७ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मच्छीमारांनीही पुढील चार दिवस महाराष्ट्र – गोवा सागरी किनाऱ्यावर जावू नये, अशा सूचना प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0