राष्ट्रपती म्हणालेः मी ५ लाखातले ५० टक्के कर भरतो

राष्ट्रपती म्हणालेः मी ५ लाखातले ५० टक्के कर भरतो

नवी दिल्लीः देशाच्या विकासासाठी नागरिकांनी नियमित कर भरण्याचे आवाहन करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मी पण कर भरतो असे स्पष्ट केले. माझे वेतन महिन्य

‘शाहीन बागमधील आंदोलन शांततापूर्ण’
सुशांत सिंह, साना गांगुली, फरहान बोलले; सौरभ, सेहवागचे मौन, मराठी चित्रपटसृष्टी थंड
अंकुश ठेवा, ऑक्सिजनवर आणि लोकशाहीवरही!

नवी दिल्लीः देशाच्या विकासासाठी नागरिकांनी नियमित कर भरण्याचे आवाहन करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मी पण कर भरतो असे स्पष्ट केले. माझे वेतन महिन्याला ५ लाख रुपये आहे पण त्यातील पावणे तीनलाख रुपये कर म्हणून कापून घेतले जातात. माझ्याकडे जेवढे पैसे उरतात त्या पेक्षा अधिक कमाई काही लोक करतात अशी टिप्पण्णीही त्यांनी केली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

शुक्रवारी कोविड तीन दिवसांच्या उ. प्रदेश दौर्यावर आले होते. एका विशेष रेल्वेने दिल्लीहून कानपूर येथे जात असताना झिंझक या शहरात त्यांचा काही काळ मुक्काम होता, त्यावेळी त्यांनी ही टिप्पण्णी केली. झिंझकपासून नजीकच कोविंद यांचे जन्मगाव आहे. आपल्या गावात भेट देण्याअगोदर झिंझक रेल्वे स्थानकावर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात नागरिकांना कर भरण्याचे आवाहन केले.

कोविंद म्हणाले, ‘आपण कधी-कधी रागात येऊन रेल्वे रोको करत असतो, रेल्वेची वाहतूक बंद पाडत असतो, रेल्वेला आगी लावण्याचेही प्रकार घडत असतात. अशा वेळी खरे नुकसान देशातील करदात्यांचे होत असते. त्यांच्या पैशातून देशाची संपत्ती उभी केली जात असते. आणि यात खोटे असे काही नाही. कारण देशाचा राष्ट्रपती हा सर्वाधिक वेतन मिळवणारा कर्मचारी ओळखला जातो. मी करापोटी दर महिना २.७५ लाख रु. देत असतो. मला ५ लाख रुपये वेतन आहे पण या वेतनावर करही लावला जात असतो. मग माझ्या हातात किती उरतात? जे काही मी वाचवतो त्या पेक्षा अधिक माझे अधिकारी मिळवत असतात. येथले शिक्षक.. तर सर्वाधिक कमाई करणारे आहेत. मला एवढेच सांगायचे आहे की, आपण जो कर भरतो त्यातून देशाचा विकास होत असतो. मग नुकसान कोणाचे होते? तुमचे व आपणा सर्वांचे..’ असे कोविंद म्हणाले.

रविवारी आपल्या गावात कोविंद हेलिकॉप्टरने उतरले तेव्हा त्यांनी गावाची माती आपल्या कपाळी लावली. अत्यंत भावूकपणे त्यांनी भाषण केले. या देशाचा राष्ट्रपती सामान्य कुटुंबातला, खेड्यातला व्यक्तीही होऊ शकतो. एका छोट्या खेडेगावातला मुलगा देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचू शकतो अशी कल्पनाही माझ्या स्वप्नात केली नव्हती. आज जो मी काही आहे त्याचे श्रेय या गावाच्या मातीला, या भागाला व तुमच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे आहे, अशी कृतज्ञता व्यक्त केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0