मोदी म्हणतात, कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच

मोदी म्हणतात, कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच

नवी दिल्लीः सरकार ३ शेती कायदे रद्द करत नसल्यावरून एकीकडे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र सरकारने केलेले तीनही क

सीतारामन यांच्या पॅकेजमध्ये शेतकरी व मनरेगाला ठेंगा
शेतकरी आंदोलनात खलिस्तानी : केंद्र
श्रीमंत शेतकरी.. आंतररराष्ट्रीय कारस्थान.. मूर्खपणा

नवी दिल्लीः सरकार ३ शेती कायदे रद्द करत नसल्यावरून एकीकडे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र सरकारने केलेले तीनही कायदे शेतकर्यांच्या हिताचे, कल्याणकारी असून शेतकर्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून नव्या बाजारपेठेला जन्म देणारे आहेत, असा दावा केला. शनिवारी ते फिक्कीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. मोदींनी आपल्या भाषणात शेतकर्यांच्या आंदोलनाचा थेट उल्लेख केला नाही पण शेती सुधारणांमागील सरकारचा उद्देश साफ होता, शेतकर्यांच्या अडचणी दूर करणारा होता, शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान व गुंतवणूक आणण्यासाठी होता असे सांगितले.

शेती कायद्यात शेतकर्यांना जुन्या मंडईबरोबर अन्य एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली होती, त्यात शेतकरी आपला माल विक्री वा खरेदी करू शकतात, याने शेतकर्यांचे उत्पन्नच वाढेल असे ते म्हणाले. मोदींनी शेती उद्योगात अन्य क्षेत्रांनी गुंतवणूक करावी असे आवाहन केले. सध्याची अन्य क्षेत्रांची गुंतवणूक समाधानकारक नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. खासगी उद्योगांनी व व्यावसायिकांनी या क्षेत्राकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले, त्यांनी मर्यादित कामगिरी बजावली. देशातल्या ग्रामीण भागातील विकास दर नागरी भागापेक्षा अधिक आहे, तेथे गुंतवणूकीची गरज आहे, असे ते म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: