पंजाब मंत्रिमंडळः ७ मंत्र्यांवर गुन्ह्यांची नोंद, ९ कोट्यधीश

पंजाब मंत्रिमंडळः ७ मंत्र्यांवर गुन्ह्यांची नोंद, ९ कोट्यधीश

नवी दिल्ली/चंडीगडः पंजाबमध्ये नव्याने सत्तेवर आलेल्या आम आदमी पार्टीच्या सरकारमधील ११ पैकी ७ मंत्र्यांवर गुन्हे असून ९ मंत्री कोट्यधीश असल्याची माहिती

भाजपमध्ये येण्याची ऑफर आली: मनीष सिसोदिया
दंगलग्रस्त जहांगीरपुरी भागात अतिक्रमण विरोधात बुलडोझर कारवाई
आपची लाट नव्हे सुनामी

नवी दिल्ली/चंडीगडः पंजाबमध्ये नव्याने सत्तेवर आलेल्या आम आदमी पार्टीच्या सरकारमधील ११ पैकी ७ मंत्र्यांवर गुन्हे असून ९ मंत्री कोट्यधीश असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या एक अहवालात नमूद करण्यात आली आहे.

गुन्हे दाखल असलेल्या ११ मंत्र्यांमध्ये खुद्द राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा समावेश आहे.

एडीआरच्या अहवालानुसार ७ मंत्र्यांपैकी ४ मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल असून यात दोषी आढळल्यास ५ किंवा अधिक वर्षांची शिक्षा होऊ शकते. या चार मंत्र्यांमध्ये मान यांच्या व्यतिरिक्त गुरमीत सिंग मीत हेअर, कुलदीप सिंह धालीवाल व हरपाल सिंह चीमा या मंत्र्यांची नावे आहेत.

या ४ मंत्र्यांमध्ये कुलदीप सिंह धालीवाल यांच्यावर खुनाचा आरोप आहे.

एडीआरच्या अहवालात ११ कोट्यधीश मंत्र्यांचा उल्लेख आहे. या ११ मंत्र्यांपैकी ९ कोट्यधीश असून प्रत्येकाची संपत्ती सरासरी २.८७ कोटी रु. आहे. या कोट्यधीश मंत्र्यांमध्ये होशियारपूर येथील ब्रह्म शंकर (जिम्पा) यांची संपत्ती सर्वाधिक ८.५६ कोटी रु. इतकी असून लाल चंद या मंत्र्यांकडे सर्वात कमी ६.१९ लाख रु. इतकी संपत्ती आहे. ब्रह्म शंकर यांच्यावर १.०८ कोटी रु.चे कर्जही असल्याचे एडीआरचे म्हणणे आहे.

भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळातील ५ मंत्र्यांचे शिक्षण १० वी किंवा १२ वी पर्यंत झाले आहे. उर्वरित मंत्र्यांनी पदवी मिळवली आहे.

६ मंत्र्यांचे वय ३१ ते ५० वर्ष दरम्यान असून ५ मंत्र्यांचे वय ५१ ते ६० दरम्यान आहे.

दरम्यान सोमवारी भगवंत मान यांनी मंत्रिमंडळ खातेवाटप केले, त्यानुसार मान यांनी स्वतःकडे गृहखाते, सामान्य प्रशासन खाते ठेवले असून राज्याचे अर्थ व महसूलमंत्री पद हरपाल सिंह चीमा यांना देण्यात आले आहे. गुरमीत सिंह यांना शिक्षण खाते देण्यात आले आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0