पंजाबमध्ये मनपा निवडणुकांत भाजपचा धुव्वा

पंजाबमध्ये मनपा निवडणुकांत भाजपचा धुव्वा

चंदीगडः पंजाबमध्ये ६ महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसने निर्भेळ यश कमावले, तर भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. भटिंडा, होशियारपूर, कपूरथळा

केजरीवाल यांचा पारंपरिक सिद्धांतांना छेद
२२ तासानंतर दिल्लीची मतदान टक्केवारी (६२.५९ टक्के) जाहीर
दिल्लीत केजरीवाल यांची हॅटट्रिक ; जनमत चाचण्यांचा निष्कर्ष

चंदीगडः पंजाबमध्ये ६ महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसने निर्भेळ यश कमावले, तर भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. भटिंडा, होशियारपूर, कपूरथळा, अबोहर, बटाला व पठाणकोट या शहरातील मनपा काँग्रेसने ताब्यात घेतल्या. अन्य एक महानगरपालिका मोगा येथे काँग्रेसला विजयासाठी ६ वॉर्डांची गरज आहे. तर अन्य एक मनपा निवडणूक निकाल गुरुवारी आहे. याच बरोबर १०९ नगर परिषदांचा निकालही गुरुवारी अपेक्षित आहे.

मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्याविरोधात पंजाब व हरयाणामध्ये जनमत क्षुब्ध असल्याचे चित्र या निवडणुकांमध्ये दिसून आले. पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकां होत असून काँग्रेसला या पालिका निवडणुकांतील विजयाचा फायदा होईल असे बोलले जात आहे.

पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी पंजाबच्या जनतेने आप, भाजप, अकाली दलाला साफ नाकारले असून आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या. आमच्या कार्यकर्त्यांनी विजयासाठी मेहनत, कष्ट उपसले अशी प्रतिक्रिया दिली.

पंजाबमध्ये ८ महानगर पालिका व १०९ नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी ९,२२२ उमेदवार उभे होते. काँग्रेसने आपले २,०३७, अकाली दलाने १,५६९, भाजपने १,००३ व आम आदमी पार्टीने १,६०६ उमेदवार उभे केले होते. राज्यात ७० टक्क्याहून अधिक मतदान झाले होते.

भाजप व अकाली दलाने स्वतंत्र निवडणुका लढल्या होत्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: