गुरुद्वाराचे पावित्र्यभंग; दोघांची जमावाकडून हत्या

गुरुद्वाराचे पावित्र्यभंग; दोघांची जमावाकडून हत्या

नवी दिल्लीः अमृतसरमधील शीखांचे पवित्र धार्मिक स्थान असलेल्या सुवर्ण मंदिरात व कपुरथळा येथील एका गुरुद्वाराचे पावित्र्यभंग केल्यामुळे दोन जणांना जमावान

सीएएविरोधातील नाटक देशद्रोह नव्हे : कर्नाटक न्यायालय
अग्निपथ भरतीत सहकार्य नसल्याने लष्कर पंजाबवर नाराज
मागच्या वर्षात रुपयाची कामगिरी खराब

नवी दिल्लीः अमृतसरमधील शीखांचे पवित्र धार्मिक स्थान असलेल्या सुवर्ण मंदिरात व कपुरथळा येथील एका गुरुद्वाराचे पावित्र्यभंग केल्यामुळे दोन जणांना जमावाने ठार मारले. २४ तासाच्या काळात या दोन घटना घडल्या.

अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात शनिवारी संध्याकाळी प्रार्थना एका तरुणाने सर्व अडथळे तोडून गर्भग्रहात प्रवेश करत शीखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथसाहिबच्या जवळ ठेवलेली तलवार उचलण्याचा प्रयत्न केला. त्याला त्या क्षणी काही भाविकांनी रोखले, आणि मंदिराच्या बाहेर नेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यात या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. ही व्यक्ती २० ते २५ वयाची होती, तिचा ठावठिकाणा शोधण्याचे काम सुरू आहे.

दुसरी गटना रविवारी दुपारी ४च्या सुमारास कपूरथळा जिल्ह्यात घडली. येथे निजामपूर गावातील गुरुद्वारामध्ये एक व्यक्ती शीखांच्या निशान साहिब या पवित्र ध्वजाचा अवमान करत असल्याच्या कारणावरून तिची जमावाने हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या अमृतसर घटनेबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी दुःख प्रकट करत जमावाकडून झालेली हत्या निंदनीय असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

तर अकाली दलाने या घटना कटकारस्थान असल्याचा आरोप केला आहे. राज्य व केंद्र सरकारने या घटनेची चौकशी करावी. पंजाबला कमकुवत करण्याचे हे कारस्थान असल्याचा आरोप अकाली दलाचे खासदार बलविंदर भूंदर यांनी एनडीटीव्हीशी बोलताना केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0