‘धार्मिक ग्रंथांचा अवमान, सार्वजनिक फाशी हवी’

‘धार्मिक ग्रंथांचा अवमान, सार्वजनिक फाशी हवी’

चंदिगडः दोन दिवसांपूर्वी पंजाबात शीखाच्या पवित्र धार्मिक ग्रंथांचा अवमान केल्या प्रकरणी दोन तरुणांची जमावाकडून हत्या झाली होती. त्या घटनेवरून पंजाब का

ओबीसी आरक्षण : राज्य सरकार अध्यादेश काढणार
‘आर्यनने कट रचल्याचा एनसीबीकडे पुरावा नाही’
कोरोनाताही भांडवलदारांचे हित

चंदिगडः दोन दिवसांपूर्वी पंजाबात शीखाच्या पवित्र धार्मिक ग्रंथांचा अवमान केल्या प्रकरणी दोन तरुणांची जमावाकडून हत्या झाली होती. त्या घटनेवरून पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी धार्मिक ग्रंथांचा अवमान करणाऱ्या दोषींना थेट सार्वजनिक रित्या फाशीच द्यायला हवी अशी मागणी केली. ते मलेरकोटला येथे एका सभेत बोलत होते.

या सभेत सिद्धू म्हणाले, धार्मिक ग्रंथ कुराण असो वा भगवद गीता किंवा गुरु ग्रंथ साहिब असो त्याचा अवमान करणे ही चूक नसते तर सुनियोजित कटकारस्थान असतं. एका वर्गाला संपवण्याचा तो प्रयत्न असतो. अशा कृत्याने जनतेच्या भावना दुखावतात. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांना थेट सार्वजनिक रित्या फाशी द्यावी. चुका होऊ शकतात पण धार्मिक ग्रंथांचा अवमान करणे ही चूक नसून ते जाणूनबुजून केलेले कृत्य असते, त्यामुळे या प्रकरणातील दोषींना घटनेतील सर्वात कडक शिक्षा म्हणजे फाशी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

सिद्धू यांचे हे वक्तव्य अशा परिस्थिती आले आहे की, पंजाबमधील राजकारण धार्मिक ग्रंथाचा अवमान केल्याने तप्त झाले असून सर्व राजकीय पक्ष आपल्या प्रतिक्रिया देताना सावधगिरी बाळगताना दिसत आहेत. काँग्रेस सोडून अन्य पक्षांनी झुंडशाहीचा निषेध केला आहे व झालेली घटना कटकारस्थान असल्याचा आरोप केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनीही ग्रंथाच्या अवमानाचा निषेध केला आहे पण त्यांनी झुंडशाहीविरोधात प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

दरम्यान पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांनी धार्मिक ग्रंथांचा अवमान करणार्यांविरोधात कडक शिक्षा देणाऱ्या राज्य सरकारच्या दोन कायद्यांवर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करावी अशी मागणी केंद्राकडे केली आहे. या कायद्यात कोणत्याही धर्माच्या पवित्र ग्रंथांचा अवमान केल्यास दोषींना आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0