पूरग्रस्तांसाठी ६ हजार कोटींची मागणी

पूरग्रस्तांसाठी ६ हजार कोटींची मागणी

मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक व कोकणामध्ये आलेल्या प्रलंयकारी पुरातून तेथील सर्व जनजीवन उद्ध्वस्त झाले असून लाखो पूरग्रस्तांना मदत मिळावी म

जलसंपदा प्रकल्पांना गती द्या – मुख्यमंत्री
प्रश्न: आपले आणि आमदारांचे – ४
सांगली-कोल्हापूर पूरपरिस्थिती गंभीरच

मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक व कोकणामध्ये आलेल्या प्रलंयकारी पुरातून तेथील सर्व जनजीवन उद्ध्वस्त झाले असून लाखो पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारकडे ६ हजार ८१३ कोटी रु.ची मदत मागितल्याचे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंगळवारी राज्यमंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीत राज्यातील पूरग्रस्त भागात हजारो घरे जमीनदोस्त वा पाण्यात वाहून गेलेली आहेत, अनेकांची गुरे वाहून गेली आहेत तर हजारो हेक्टर जमिनीवरील पीकही वाहून गेले आहे. या पूरग्रस्तांना नव्याने जीवन उभे करण्यासाठी सरकारची ही मदत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्राकडे पाठवलेला प्रस्ताव ६,८१३ कोटी रु.चा असून यात पीक नुकसानीसाठी २ हजार ८८ कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्य आणि अतिरिक्त मनुष्यबळ म्हणून ७५ कोटी रु., रस्ते दुरुस्तीसाठी ५७६ कोटी रुपये, तात्पुरत्या छावण्यांसाठी २७ कोटी रु., जनावरांसाठी ३० कोटी रु., स्वच्छतेसाठी ७९ कोटी रु.ची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुरात वाहून गेलेली घरे नव्याने बांधून दिली जाणार आहेत.

ही मदत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसाठी ४,७०० कोटी रु. तर उर्वरित भागांसाठी २१०० कोटी रु.ची असेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

केंद्राकडे पाठवलेला मदतीचा प्रस्ताव

  • कोल्हापूर, सांगली सातारा जिल्ह्यासाठी ४,७०० कोटी रुपये, कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी २, १०५ कोटी रुपये.
  • केंद्राची मदत मिळेपर्यंत राज्य सरकारकडून मदत करण्याचा निर्णय
  • पूरग्रस्तांना शहरात १५ हजार, ग्रामीण भागात १० हजार रुपये देणार
  • मृत व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी ३०० कोटी रुपये.
  • बचाव कार्यासाठी २५ कोटी रुपये.
  • तात्पुरत्या छावण्यांसाठी २७ कोटी रुपये.
  • कचरा सफाईसाठी ६६ ते ७० कोटी रुपये.
  • ग्रामीण भागात १० हजारांव्यतिरिक्त जमिनीचे पैसे, मृत जनावरांची नुकसान भरपाई आणि पिकाचे पैसे देणार(२ हजार ८८ कोटी रुपये).
  • पोलीस पाटील, सरपंच यांच्या साहाय्याने कोणतीही अट न लादता मदत देणार.
  • घरांच्या पुनर्बांधणीसाठी २२२ कोटी रुपये.
  • सार्वजनिक बांधकाम, महापालिका, जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीसाठी ८७६ कोटी रुपये.
  • जलसंपदा आणि जलसंधारण – १६८ कोटी रुपये
  • सार्वजनिक आरोग्य – ७५ कोटी रुपये
  • शाळा, पाणी पुरवठा दुरुस्तीसाठी – १२५ कोटी रुपये
  • छोटे व्यावसायिकांना नुकसानीच्या ७५ टक्के आणि जास्तीत जास्त ५० हजार रुपये नुकसान भरपाई. यासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद.

५ लाख ६० हजार पूरग्रस्तांची सुटका

राज्यातील पूरग्रस्त भागात अडकलेल्या सुमारे ५ लाख ६० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली आहे.

कोल्हापुरातून ३ लाख ३६ हजार २९७ तर सांगली येथून १ लाख ७४ हजार ४८५ पूरग्रस्तांना हलवण्यात आले आहे.

पूरग्रस्तांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात २१० तर सांगलीत १६८ तात्पुरता निवास केंद्रे उभी करण्यात आली आहेत. तर या दोन जिल्ह्यातील ६१ हजार २७ जनावरांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0