राफेल घोटाळाः दलालीसाठी बनावट बिले; सीबीआयचे दुर्लक्ष

राफेल घोटाळाः दलालीसाठी बनावट बिले; सीबीआयचे दुर्लक्ष

नवी दिल्लीः राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारात २००७ व २०१२ या काळात दसॉल्ट एव्हिएशन कंपनीने शस्त्रास्त्र दलाल सुशेन गुप्ता याला लाच म्हणून ७० लाख

राफेल सौद्यात आर्थिक घोटाळा
‘रफालवरील निकाल चौकशीचे सूतोवाच करणारा’
‘कॅग’चा राफेलवरील अहवाल – मोदी सरकारची कुठे सरशी नि कुठे हार?

नवी दिल्लीः राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारात २००७ व २०१२ या काळात दसॉल्ट एव्हिएशन कंपनीने शस्त्रास्त्र दलाल सुशेन गुप्ता याला लाच म्हणून ७० लाख युरो देण्यासाठी बनावट बिले तयार केली असे वृत्त पॅरिसस्थित मीडियापार्ट या वेबसाइटने दिले आहे. मीडियापार्टने तशी बिलेही प्रसिद्ध केली आहेत. ही बिले सीबीआयला मिळूनही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयने फारसे प्रयत्न केले नाहीत, असे मीडियापार्टचे म्हणणे आहे.

मीडिया पार्टच्या नुसार राफेल विमान खरेदीत दलाली म्हणून ७.५ दशलक्ष युरो (६५ कोटी रुपये) इतकी रक्कम दसॉल्टने शस्त्रास्त्र दलाल सुशेन गुप्ता याला पाठवल्याची बिले सीबीआयकडे पुरावा म्हणून आलेली आहेत. सुशेन गुप्ता याच्या मॉरिशिसस्थित कंपनी इंटरस्टेलार टेक्नॉलॉजीला २००७ व २०१२ मध्ये सुमारे ७.५ दशलक्ष युरो मिळाले. हा पैसा खोटी बिले तयार करून मॉरिशसला वळवण्यात आला. त्या बिलांमध्ये दसॉल्ट एव्हिएशन या कंपनीच्या नावही काही ठिकाणी चुकीचे टाकण्यात आले होते.

सीबीआयला ही सर्व बनावट बिले मॉरिशसच्या अटर्नी जनरलच्या कार्यालयातून ११ ऑक्टोबर २०१८मध्ये मिळाली आहेत. ही बिले मिळण्याअगोदर बरोबर एक आठवडा अगोदर सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण व भाजपचे माजी मंत्री यशवंत सिन्हा व अरुण शौरी यांनी राफेल विमान खरेदी सौद्यात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर एक आठवड्यानंतर सीबीआयला ही ७.५ दशलक्ष युरोची बनावट बिले मिळाली.

व्हीहीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यात पैशाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सुशेन गुप्ता याच्यावर असून त्याची चौकशी ईडीकडून सुरू आहे.

मीडिया पार्टने सुशेन गुप्ता याचे १५ वर्षांचे दसॉल्ट व थेल्स या कंपन्यांशी असलेले संशयास्पद व्यवहार उघडकीस आणले होते. या काळात सुशेन गुप्ताला या कंपन्यांनी लक्षावधी युरो दलाली देण्यात आली होती. हा पैसा बनावट कंपन्या व बेनामी खात्यांमध्ये जमा करण्यात आला होता. बहुतांश पैसा बनावट बिले तयार करून ऑफशोर अकाउंटमध्ये जमा करण्यात आला होता.

नेमके प्रकरण काय आहे?

गेल्या एप्रिल महिन्यात राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत २०१७-१८ मध्ये दासो एव्हिएशन व डेफसिस सॉल्यूशन्स (Defsys Solutions) या भारतीय संरक्षण कंपनीमध्ये संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे फ्रान्सच्या Agence Française Anticorruption (AFA) या भ्रष्टाचार विरोधी संस्थेचे म्हणणे असल्याचे वृत्त पॅरिसस्थित मीडियापार्ट या वेबसाइटने प्रसिद्ध केल्याने राफेल विमान खरेदी घोटाळा पुन्हा चर्चेत आला होता.

हा व्यवहार ५,०८,९२५ युरो इतक्या रकमेचा झाल्याचे व ही रक्कम क्लाएंटला भेट म्हणून दिल्याचे मीडियापार्टचे म्हणणे होते.

या अहवालात असा दावा केला होता की, २०१७मध्ये विमान विक्रीचा करार सादर करण्यास राफेल उत्पादन कंपनी असमर्थ ठरल्याने त्यांचा हा व्यवहार संशयास्पदरित्या बोगस खरेदी वा मध्यस्थाला पैसे देऊन करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

या नव्या वृत्तामुळे पुन्हा नवे प्रश्न उपस्थित झाले होते. ऑगस्ट वेस्टलँड प्रकरणात संरक्षण दलाल सुशेन गुप्ता याची चौकशी सीबीआयकडून होत असताना याच सुशेन गुप्ताचे राफेल विमान विक्रीप्रकरणात भारतीय संरक्षण कंपनीच्या मालकाशी संबंध असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्ताची द वायरने शहानिशा केलेली नाही. पण फ्रान्सच्या भ्रष्टाचार विरोधी संस्थेने राफेल कराराची चौकशी केली जावी व कायदेशीर कारवाई करावी असा पवित्रा मात्र घेतलेला नाही.

२०१७मध्ये AFA संस्था स्थापन करण्यात आली होती. ही संस्था फ्रान्स सरकारला उत्तरादायित्व असून बड्या कंपन्यांच्या व्यवहारांमध्ये किती पारदर्शकता पाळली जाते, हे करार फ्रान्सचे कायद्यांचे पालन करून केले जातात का, याची शहानिशा करत असते. या संस्थेने २०१७ सालच्या दासो समुहाचे लेखापरीक्षण तपासल्यानंतर त्यांना ५,०८,९२५ युरो खर्च झाल्याचे दिसून आले. हा खर्च क्लाएंटला भेट म्हणून दिल्याचे नमूद करण्यात आले होते, अशी माहिती पुढे आली आहे.

दासो समूहाने ५,०८,९२५ युरो खर्च क्लाएंटला भेट म्हणून दिल्याचे समर्थन करताना फ्रान्सच्या भ्रष्टाचार तपास यंत्रणेला डेफसिस सॉल्यूशन्सने ३० मार्च २०१७ रोजीचे ‘प्रोफॉर्मा इनव्हॉइस’ सादर केलेले आहे. यात इनव्हॉइसमध्ये राफेल विमानाच्या ५० विशाल नकला (मॉडेल) तयार केल्याची ५० टक्के रक्कम १०,१७,८५० युरो दिल्याचे नमूद केले आहे. प्रत्येक युनिटची किंमत २०,३५७ युरो इतकी असल्याचेही या दसॉल्टचे म्हणणे आहे.

यानंतर फ्रान्सच्या भ्रष्टाचार तपास यंत्रणेने, राफेल कंपनीने २० हजार युरो किंमतीच्या कारच्या आकाराच्या विमानाच्या नकला भारतीय कंपनीने बनवाव्या असे का सांगितले, शिवाय हा खर्च क्लायंटला भेट म्हणून व्यवहारात का दाखवले असा प्रश्न केला आहे.

मीडियापार्टच्या नुसार दासो समूह विमानाच्या नकलांचे एकही कागदपत्र फ्रान्सच्या भ्रष्टाचार तपास यंत्रणेला सादर करू शकलेले नाहीत.

डेफसिस सॉल्यूशन्स (Defsys Solutions) कंपनी कोणाची?

ज्या दासो कंपनीने भारताला राफेल विमाने पुरवली होती, त्या कंपनीची भारतातील मध्यस्थ कंत्राटदार म्हणून डेफसिस सोल्युशन्सने काम केले आहे. ही कंपनी गुप्ता कुटुंबाची असून गेल्या तीन पिढ्या हे कुटुंब हवाई क्षेत्रात व संरक्षण उद्योगांमध्ये मध्यस्थ म्हणून काम करत आहेत.

जानेवारी २०१९मध्ये कोब्रापोस्ट व नंतर इकॉनॉमिक टाइम्स यांनी गुप्ता कुटुंबातील सुशेन गुप्ता ही व्यक्ती दासो कंपनीच्या राफेल विमान विक्रीसाठी मध्यस्थाचे काम करत असल्याचे वृत्त दिले होते. सुशेन गुप्ता यांनी राफेलचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय संरक्षण खात्यातून महत्त्वाची कागदपत्रे मिळवल्याचे मीडियापार्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सप्टेंबर २०१६मध्ये तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर व फ्रान्सचे संरक्षणमंत्री जाँ ड्रिएन यांच्या राफेल करार झाला होता. त्या वेळी सुशेन गुप्ता याने राफेल विमानांच्या नकलांचे १० लाख युरोचे इनव्हॉइस दासोला पाठवल्याचे उघडकीस आले होते. यानंतर ईडीने ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात मार्च २०१९मध्ये सुशेन गुप्ता याला अटक केली व नंतर त्याला जामीन देण्यात आला होता.

२०२०च्या अखेरीस फ्रान्सच्या भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेने दासोचे लेखापरीक्षण करून त्याला अहवाल सरकारकडे पाठवला. पण या व्यवहारात विसंगती आढळूनही या प्रकरणाची चौकशी करावी असे या यंत्रणेने म्हटलेले नाही. उलट विमानांच्या नकलांचा विषय केवळ दोन परिच्छेदात आटोपला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0