जीडीपीचे सरकार, नोकरशाहीला भय नाहीः रघुराम राजन

जीडीपीचे सरकार, नोकरशाहीला भय नाहीः रघुराम राजन

नवी दिल्लीः देशाच्या अर्थव्यवस्थेचा पहिल्या तिमाहीतील जीडीपी उणे २३.९ टक्के इतका घसरल्याचे भय सरकार व नोकरशाहीला वाटणे गरजेचे असल्याचे मत रिझर्व्ह बँक

‘लष्कर ए तय्यबा’चा कमांडरचा भाजपचा सोशल मीडिया प्रभारी
अन्यथा भाजपचा राजीनामा देईन – चंद्र कुमार बोस
जिथे पुस्तके जाळली जातात, तिथे माणसेही जाळली जातील

नवी दिल्लीः देशाच्या अर्थव्यवस्थेचा पहिल्या तिमाहीतील जीडीपी उणे २३.९ टक्के इतका घसरल्याचे भय सरकार व नोकरशाहीला वाटणे गरजेचे असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गवर्नर रघुराम राजन यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये व्यक्त केले आहे. या पोस्टमध्ये राजन यांनी असेही म्हटलेय की, भविष्याचा वेध घेत सध्याच्या संसाधनांची बचत होण्याच्या उद्देशाने सरकारने अनेक प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली आहे, त्याने आत्मविनाशच अधिक झाला आहे. सरकारने या काळात मदत देणे महत्त्वाचे आहे. सध्या देशात कोरोनाची महासाथ वेगाने वाढत आहे, अशा परिस्थितीत सरकारने आपल्या खर्चांवर नियंत्रण आणण्याची गरज आहे.

ते म्हणाले, जर अर्थव्यवस्था आजारी आहे, असे सरकार मानत असेल तर या आजाराशी लढण्यासाठी उपचारांची गरज आहे. हे उपचार केले नाहीत तर लोक आपल्या जेवणाखाण्यावरचा खर्च कमी करतील. मुलांना शाळेतून काढतील. उधारी घेण्याऐवजी सोने गहाण ठेवतील. कर्जाचे हप्ते व भाडे वाढतच जाणार आहे. छोटे उद्योग, दुकाने, हॉटेल-रेस्तराँ आपल्या कामगारांना वेतन देणार नाहीत. हे उद्योग वाढत्या कर्जापायी बंद पडतील. जेव्हा कोविड-१९वर नियंत्रण येईल तेव्हा अर्थव्यवस्था बरबाद झाली असेल.

राजन यांनी आपल्या पोस्टमध्ये नोकरशाहीवरही टीका केली. ते म्हणाले, नोकरशाहीची मानसिकताही निराशाजनक आहे. महासाथीच्या अगोदर अर्थव्यवस्थेला आलेली सुस्ती व नंतर वित्तीय परिस्थिती बिघडल्यानंतर नोकरशाहीने तिला गती देण्यासाठी ना मदत केली ना उर्जितावस्था येईल असे प्रयत्न केले. ही मानसिकता निराशावादी असून सरकारने आपल्या संसाधानांचा अधिक विस्तार करून शहाणपणाने वेगवेगळ्या प्रकारे खर्च केला पाहिजे. पण असे काही दिसत नाही. पहिल्यांदा सरकारचे प्रयत्न दिसले पण नंतर ते प्रयत्न सोडून देण्यात आले.

राजन यांनी आर्थिक स्रोतांवर भर देताना सांगितले की, भारताने सद्यपरिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत घेण्याचाही विचार केला पाहिजे. परकीय गुंतवणुकीदारांमध्ये विश्वास उत्पन्न केला पाहिजे. हे जग कोविड-१९च्या महासाथीतून लवकर बाहेर पडेल पण भारताची निर्यात घसरल्याने भारताला या आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी अधिक काळ जाणार आहे, असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0