भयामुळे सरकारवर टीका केली जात नाही – राहुल बजाज

भयामुळे सरकारवर टीका केली जात नाही – राहुल बजाज

मुंबई : देशात भय व अस्थिर वातावरण असल्याने लोक मनमोकळपणे, निर्भयपणे सरकारवर टीका करत नाही असे विधान प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी केंद्रीय गृहमं

माझं बुद्धिप्रामाण्य – श्रीराम लागू
वादग्रस्त निर्णय देणाऱ्या न्यायाधीशाची बढती रोखली
राष्ट्रपती म्हणालेः मी ५ लाखातले ५० टक्के कर भरतो

मुंबई : देशात भय व अस्थिर वातावरण असल्याने लोक मनमोकळपणे, निर्भयपणे सरकारवर टीका करत नाही असे विधान प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एका कार्यक्रमात उद्देशून केले.

शनिवारी ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’ या वर्तमानपत्राचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राहुल बजाज यांनी सरकारनेच देशात भय व अस्थिरता निर्माण केल्याचे सांगितले. त्यांनी भाजपच्या नेत्या प्रज्ञा ठाकूर यांच्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणण्याच्या विधानावर भाजपने कठोर कारवाई केली नाही व देशात झुंडबळीची संख्या वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त केली.

बजाज यांनी देशातील भयावर आपले उद्योगजगतातील काही मित्र बोलण्यास धजावत नाही असेही सांगितले. यूपीए-२ सरकारच्या काळात आम्ही कोणावरही थेट टीका करू शकत होतो याचा दाखला देत केंद्रातील भाजप सरकार चांगले काम करत असले तरी आता सार्वजनिक स्तरावर खुलेआम निर्भयपणे सरकारविरोधात बोलल्यास ते सरकारला आवडणार नाही अशीही पुष्टी त्यांनी जोडली.

राहुल बजाज यांनी देशातील वाढत्या झुंडबळीवर चिंता व्यक्त करत या घटना देशात वाढत असतानाही दोषींवर कारवाई झाल्याचे कुठे दिसून आलेले नाही, असे म्हटले. प्रज्ञा सिंह ठाकूर या जाहीरपणे नथुरामचे समर्थन करतात, पंतप्रधान त्यावर भाषण देऊन त्यांना माफी देणार नसल्याचे सांगतात पण अशांना संसदेच्या समितीवर नियुक्त केले जाते या विरोधाभासाकडे त्यांनी लक्ष वेधले.

कोणीही घाबरू नये

राहुल बजाज यांच्या सरकारवरील टीकेनंतर अमित शहा यांनी कुणीही घाबरण्याची गरज नाही, जे भयाचे वातावरण देशात तयार झाले आहे ते कमी करून चांगले वातावरण तयार करण्याचे प्रयत्न केले जातील. कोणीही घाबरू नये आणि कोणीही कुणाला घाबरू नये असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विधानाची भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी निषेध केला असून भाजप अशा विधानांचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करत नसल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. या देशात पूर्वीही झुंडबळी होत होते, आजही होत आहेत, कदाचित ते कमी होत आहेत. दोषींना शिक्षा होत नाही असे बोलता येत नाही. झुंडबळीच्या अनेक घटना सामोऱ्या येतात व त्या संपूनही जातात. अनेकांना शिक्षा होते पण प्रसारमाध्यमे अशा बातम्या प्रसिद्ध करत नाही, अशी टीका शहा यांनी केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0