‘मोदी सरकारच्या बेपर्वाईमुळे कोविड महासाथीत ४० लाख मृत’

‘मोदी सरकारच्या बेपर्वाईमुळे कोविड महासाथीत ४० लाख मृत’

नवी दिल्लीः कोविडच्या महासाथीत मोदी सरकारच्या बेपर्वाईमुळे सुमारे ४० लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी केल

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर ईशान्य भारत अस्वस्थच
फडणवीसांचे समाधान, राष्ट्रवादीचा कार्यक्रम
संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी होणार – अमित शहा

नवी दिल्लीः कोविडच्या महासाथीत मोदी सरकारच्या बेपर्वाईमुळे सुमारे ४० लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला. आपल्या आरोपाच्या पुष्टर्थ्य त्यांनी न्यू यॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा दाखला दिला असून या वृत्ताचे चित्र त्यांनी ट्विटर प्रसिद्ध केले.

इंडिया इज़ स्टॉलिंग डब्लूएचओज़ एफर्ट्स टू मेक ग्लोबल कोविड डेथ टोल पब्लिक असा मथळा असलेले वृत्त न्यू यॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्तात असे म्हटले आहे की जागतिक आरोग्य संघटनाकोविड महासाथीत मरण पावलेल्यांचा आकडा प्रसिद्ध करण्याच्यातयारीत असताना भारत सरकारकडून या प्रयत्नात अडसर निर्माण केलेजात आहेत. भारताने अद्याप आपला आकडा त्यांना पाठवलेला नाही.

राहुल गांधी म्हणाले, मोदी स्वतःही सत्य बाब सांगत नाहीत आणि दुसऱ्यांनाही सांगू देत नाहीत. कोविड महासाथीत ऑक्सिजन अभावी कोणी मेले नाही, असे मोदी अजून सांगत आहे. मी अगोदर सांगितले होते की, देशात सरकारच्या बेपर्वाईमुळे ५ लाख नागरिक नाहीत तर ४० लाख नागरिक मरण पावले आहेत आणि या मृतांची जबाबदारी मोदींनी घेऊन प्रत्येक पीडित कुटुंबाला ४ लाख रु.ची सरकारने मदत दिली पाहिजे.  

जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे काय आहे?

कोविड महासाथीत जगभरात किती नागरिकांचा मृत्यू झाला या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेकडून सर्वं देशांना आकडेवारीची मागणी आहे. पण भारताने मृतांच्या आकडेवारीबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. शनिवारी भारत सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड मृतांच्या आकडेवारीसाठी वापरण्यात येणाऱ्या गणितीय प्रणालीवर आक्षेप घेतला. भारतासारख्या विशाल भूप्रदेश व एक अब्ज ४० कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात कोविड मृतांचे आकडे मिळवण्यासाठी अशी गणितीय प्रणाली लागू करता येत नाही, असे भारताचे म्हणणे होते.सरकारने या संदर्भात आपली प्रतिक्रियाही शनिवारी प्रसिद्ध केली होती.

केंद्र सरकारने रविवारी कोविड मृतांचा देशभरातील आकडा प्रसिद्ध केला. त्यानुसार गेल्या दोन वर्षांच्या कोविड महासाथीत देशभरात ५ लाख २१ हजार ७५१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0