‘जीडीपी वाढ म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोलच्या दरात वाढ’

‘जीडीपी वाढ म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोलच्या दरात वाढ’

नवी दिल्लीः देशाच्या जीडीपीत वाढ झाल्याचे सरकार सांगत असले तरी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार गॅस, डिझेल, पेट्रोलच्या (जीडीपी) दरात सतत वाढ क

फारुख अब्दुल्ला सर्वपक्षीय चर्चेस तयार
कोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध?- अमित शहा
‘अदानींची कोणती प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात होती?’

नवी दिल्लीः देशाच्या जीडीपीत वाढ झाल्याचे सरकार सांगत असले तरी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार गॅस, डिझेल, पेट्रोलच्या (जीडीपी) दरात सतत वाढ करत असल्याचा थेट आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला.

बुधवारी केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ केली. या दरवाढीचा निषेध काँग्रेससह विरोधी पक्षांनी केला आहे.

मोदींच्या राज्यात जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमोस्टिक प्रॉडक्शन नसून त्यांच्या मते जीडीपी म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोलच्या दरात वाढ आहे. पंतप्रधान मोदी एकीकडे ‘डिमॉनेटायझेशन’ करतात तर दुसरीकडे अर्थमंत्री ‘मोनेटायझेशन’ची चर्चा करतात. या सरकारच्या काळात शेतकरी, मध्यम वर्ग, नोकरदार वर्ग, श्रमिक वर्गाचे डिमॉनेटायझेशन होत असून मोनेटायझेशन देशातील केवळ दोन लोकांचे होत आहे. केवल हम दो हमारे दो, असा हा प्रकार सुरू असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. मोदींच्या राज्यात दोन-चार उद्योगपतींचेच खिसे भरले जात आहेत, अशी टीका करत इंधनाच्या दरात वाढ केल्याने त्याचा सर्वाधिक फटका सामान्य माणसाला बसतो. महागाई वाढते. यूपीएच्या काळात २०१४ साली आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाची किंमत सध्याच्या किंमतीपेक्षा कमी होती तरीही मोदी सरकारकडून इंधन दरवाढ केली जात आहे. २०१४मध्ये पेट्रोल प्रती लीटर ७१.४० रु.ला मिळत होते, ते आता १०१ रुपयाला मिळत आहे. तर त्यावेळी ५७ रुपयाला मिळणारे एक लीटर डिझेल आता ८८ रुपयाला मिळत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यूपीए सरकार जे बोलत होते तेच करत होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली.

दरम्यान, केंद्रात व बिहारमध्ये एनडीए सरकारमध्ये सामील असलेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयूने या दरवाढीला विरोध केला आहे. ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणीही पक्षाने केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: