‘संपूर्ण लॉकडाऊनमुळे खेड्यापाड्यात कोरोना पसरू शकतो’

‘संपूर्ण लॉकडाऊनमुळे खेड्यापाड्यात कोरोना पसरू शकतो’

मोदी सरकारने २१ दिवसांच्या पुकारलेल्या लॉकडाऊनचा मोठा तडाखा देशाच्या अर्थकारणाला बसला असून तीन आठवड्याच्या लॉकडाऊनमध्ये देशभरात गावागावांत कोरोनाची सा

पीएम केअर फंड एनआरआय, विदेशी देणगीदारांसाठी खुला
कोरोना मृत्यू : एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखाची मदत
नाताळ साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना

मोदी सरकारने २१ दिवसांच्या पुकारलेल्या लॉकडाऊनचा मोठा तडाखा देशाच्या अर्थकारणाला बसला असून तीन आठवड्याच्या लॉकडाऊनमध्ये देशभरात गावागावांत कोरोनाची साथ पसरू शकते व बळींची संख्या प्रचंड वाढू शकते, अशी भीती काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. तसे पत्र त्यांनी पंतप्रधान मोदींना पाठवले असून या संकटसमयी सरकारसोबत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

आपल्या पत्रात राहुल गांधींनी म्हटलेय की, सरकारने एवढ्या प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे निर्माण होणार्या परिणामांकडे दुर्लक्ष करू नये. भारताची रचना गुंतागुंतीची असून जगभरातील देश कोरोनाला रोखण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत, त्यापेक्षा वेगळे प्रयत्न आपल्याला करावे लागतील, या देशात रोजंदारीवर काम करणारे कोट्यवधी हात आहेत त्यांचा रोजगार लॉकडाऊनमध्ये गेला आहे. अशा काळात लाखो लोक आपल्या गावाकडे जात आहेत, त्याच्यामुळे कोरोनाची लागण देशभरात गावागावात, खेड्यात पसरू शकते व बळीही खूप जाऊ शकतात.

राहुल गांधी यांनी या पत्रात देशातील वृद्ध, आरोग्यदृष्ट्या कमजोर पडणार्यांचे विलगीकरण सर्वात महत्त्वाचे आहे, आणि त्यांच्यावर सरकारने भर दिला पाहिजे त्याचबरोबर या घडीला तरुणांना कोरोनाचे गांभीर्य व सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व पटवून द्यायला हवे असेही सूचवले.

हा लॉकडाऊन पुढे वाढू शकतो अशीही भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. तसे झाल्यास हा देशाच्या दृष्टीने भयंकर आपत्ती ठरेल असे ते म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0