४ मे नंतर महाआरतीचा निर्णय मनसेकडून मागे

४ मे नंतर महाआरतीचा निर्णय मनसेकडून मागे

मुंबईः मशिदींवरील भोंगे न हटवल्यास ४ मे नंतर राज्यात सर्वत्र महाआरती करण्याचा निर्णय मनसेने मागे घेतला आहे. ३ मे रोजी रमझान ईद असून कोणाच्याही सणात आप

फोन उचलल्यावर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे: मुनगंटीवार
सुस्तावलेली बहुजन समाज पार्टी
युक्रेनमधील महत्त्वाच्या ४ शहरांत युद्धविराम

मुंबईः मशिदींवरील भोंगे न हटवल्यास ४ मे नंतर राज्यात सर्वत्र महाआरती करण्याचा निर्णय मनसेने मागे घेतला आहे. ३ मे रोजी रमझान ईद असून कोणाच्याही सणात आपल्याला बाधा आणायची नाही, या हेतूने महाआरती रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे ट्विट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ‘कोणीही उद्या महाआरती करू नका, पुढे काय करायचं ते मी सांगतो’, असेही राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,

उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षय्यतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन.

१ मे रोजी औरंगाबादेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर ४ मे नंतर बंद न झाल्यास मनसेचे कार्यकर्ते मशिदींपुढे हनुमान चालिसा दुप्पट आवाजात म्हणतील, असा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल असेही वाटत असताना ठाकरे यांनी अचानक महाआरतीचा निर्णय मागे घेत असल्याचे सांगितले.

आपल्या औरंगाबादच्या भाषणात राज ठाकरे यांनी भोंगे बंद झाले नाहीत तर त्या पुढील परिस्थितीला कोणीही जबाबदार राहणार नाही. लाऊडस्पीकर हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. तो विषय धार्मिक करणार असाल तर आम्ही धार्मिक पद्धतीनेच उत्तर देऊ, असाही इशारा दिला होता. सर्व मशिदींवरचे भोंगे बंद झाल्यानंतर मंदिरांवरचे भोंगे उतरवले जातील. मला कुठेही महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. तशी माझी इच्छा देखील नाही. मुस्लिम समाजाने देखील ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, असेही ठाकरे म्हणाले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: