‘मशिदींचे भोंगे थांबले नाही तर हनुमान चालिसाचे स्पीकर लावावेत’

‘मशिदींचे भोंगे थांबले नाही तर हनुमान चालिसाचे स्पीकर लावावेत’

मुंबईः ‘प्रार्थनेला माझा विरोध नाही. मात्र मशिदींवरील लागलेले भोंगे खाली उतरावावे लागतील, हा निर्णय सरकारला घ्यावा लागले. निर्णय नाही घेतला तर मशिदींस

‘बाबरीचा निकाल बिलकुल योग्य नाही’
हा वाद हिजाबचा नव्हे, तर भगवेकरणाचा!
‘माझा आदर्श नथुराम गोडसे’ : गुजरातमध्ये वक्तृत्व स्पर्धा

मुंबईः ‘प्रार्थनेला माझा विरोध नाही. मात्र मशिदींवरील लागलेले भोंगे खाली उतरावावे लागतील, हा निर्णय सरकारला घ्यावा लागले. निर्णय नाही घेतला तर मशिदींसमोर हनुमान चालिसाचे स्पीकर लावावे. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे,” असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी शिवाजी पार्क येथे पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात केले. राज ठाकरे यांनी मुंबई व अन्य शहरातल्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा हिंदुत्वावर भर दिला. मातोश्रीच्या जवळच बेहराम पाडा कसा वाढत गेला, मुंब्र्यातली ‘त्यांची’ वस्ती कशी वाढत गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी आणि आयकर खात्याला धाडी टाकायला सांगण्यापेक्षा एकदा मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील मदरशांवर धाडी टाकाव्यात. त्या ठिकाणी तुमच्या हाताला ज्या गोष्टी लागतील ते पाहून तुम्हाला सर्व परिस्थिती लक्षात येईल, असे वक्तव्यही राज ठाकरे यांनी केले.

आपल्या तास सव्वातासाच्या स्वैर भाषणात राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या जन्मावर टीका करत, आमदारांना फुकट मिळणारी घरे, जेम्स लेन, बाबासाहेब पुरंदरे अशा विषयांना स्पर्श करत उ. प्रदेशातील योगी सरकारच्या विकास कार्यक्रमाचे कौतुक केले. पण राज्यातल्या विरोधी पक्ष भाजपवर एकाही शब्दाने टीका केली नाही.

राज ठाकरे म्हणाले की, माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. मात्र तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. सकाळी पाच वाजल्यापासून त्रास होतो. कोणत्या धर्मात लाऊडस्पीकर लिहिलं आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांमध्ये बघा. कुठेही तुम्हाला लाऊडस्पीकर दिसणार नाही. तुमच्या परमेश्वरांशी प्रार्थना करायची असल्यास करा, मात्र घरात असं ते म्हणाले. प्रत्येकाने आपला धर्म हा घरात ठेवला पाहिजे. आमच्याकडे मंदिरे आहेत. टाका धाडी. काहीच मिळणार नाही. म्हणून मला जातीत खितपत पडलेला, असा हतबल पडलेला, सत्तेसमोर लाचार झालेला समाज मला आवडत नाही. अशांचं नेतृत्व मला करायचं नाही. मला आरे ला कारे करणारे माणसे पाहिजेत, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीने जातीपातीच्या राजकारणाला जन्म दिला

राज्यातले राजकारण जातीपातीत विभागले गेले आहे, याला जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण असून ही सुरूवात १९९९ सालापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाली असाही आरोप त्यांनी केला.

१९९९ साली राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार, असे राज ठाकरे म्हणाले.  बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहास लिहिला म्हणून त्यांना ब्राह्मण जातीवरून सॉफ्ट टार्गेट केलं गेलं. त्यांच्यावर टीका सुरू झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर असेही राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.

महाविकास आघाडीवर टीका

विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर पहाटे जोडा वेगळाच पाहायला मिळाला. पळून कुणाबरोबर गेले अन् लग्न कुणाबरोबर केले, काही कळेनाच, असे म्हणत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर तेवढ्यात आवाज आला हे लग्न नाही होणार… अन् फिस्कटलं. दोघेही हिरमसून घरी…हे सगळं सुरू असताना वेगळेच सुरू होते. कुणीतरी मला कडेवर घ्या ना… असे म्हणतेय. तीन नंबरचा पक्ष एक नंबरला आणि दोन नंबरला फिरवतोय… महाराष्ट्राच्या काय देशाच्या राजकारणामध्ये असा प्रकार पाहिला नाही. महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगता? एकमेंकाना शिव्या घालता अन् पुन्हा मांडीला मांडी लावून बसता? असे म्हणत ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

आमदारांना फुकट घरे कशाला?
मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये वाढ झाली आहे. आमदारांना फुकट घरे कशाला दिली पाहिजे. त्यापेक्षा पोलिसांना घरे दिली पाहिजे. आमदार, खासदारांची पेन्शन बंद केली पाहिजे. मनसेच्या आमदाराने या गोष्टीला पहिला विरोध केला, असेही ते म्हणाले.

”दोन-दोन तास रांगेत उभे राहून मतदान केलं. भाषणाला गेला. भाषणे ऐकली. विचार ऐकले. मतदान केलं. आणि मतदान केल्यानंतर महाराष्ट्रात चित्र वेगळंच दिसलं. यासाठी मतदान करता. गुलाम आहेत यांचे? कोणीही तुम्हाला कुठे ही फरफटत घेऊन जावे आणि तुम्ही जावं. तुम्ही हे सर्व विसरून जाताना, हेच हवं आहे यांना, असेही ठाकरे म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: