राजस्थान काँग्रेस सरकारकडून प्रत्येक आमदाराला आयफोन

राजस्थान काँग्रेस सरकारकडून प्रत्येक आमदाराला आयफोन

जयपूरः राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या काँग्रेस सरकारकडून २०२२-२३ या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पात प्रत्येक आमदाराला ब्रीफकेस, अर्थसंकल्पाच

राजस्थानात स्थानिक निवडणुकीत काँग्रेसचा दमदार विजय
रणभूमीतील ‘पायलट’चे भरकटलेले उड्डाण
देशाला आज आणखी अनेक नसिरुद्दीन शहांची गरज का आहे?

जयपूरः राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या काँग्रेस सरकारकडून २०२२-२३ या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पात प्रत्येक आमदाराला ब्रीफकेस, अर्थसंकल्पाची एक प्रत व महागडे आयफोन-13 भेट देण्याची घोषणा केली. गहलोत यांच्याकडे राज्याचे अर्थ खातेही आहे. गेल्या अर्थसंकल्पात गहलोत सरकारने प्रत्येक आमदाराला अत्यंत महागडा असा अँपल कंपनीचा आयपॅडही दिला होता. पुढील वर्षी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका असून त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकारक़डून घोषणांची खैरात अर्थसंकल्पात केलेली दिसून आली.

गहलोत सरकारने जुनी पेन्शन योजनाही अमलात आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २००४ सालापासून नंतर सरकारी सेवेत नियुक्त होणाऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ होणार आहे. पुढील आर्थिक वर्षात एक लाख सरकारी जागा भरण्यात येतील अशीही घोषणा गहलोत यांनी केली आहे.

त्याच बरोबर विजेवर सवलत देताना प्रती महिना १०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना ५० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारने ग्रामीण पातळीवरच्या मनरेगा योजनेसारखी शहरी पातळीवर रोजगार योजनेची घोषणा केली आहे. राज्य सरकारने पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: