राजस्थानात डिसेंबरमध्ये ९१ बालकांचा मृत्यू

राजस्थानात डिसेंबरमध्ये ९१ बालकांचा मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील कोटास्थित जे. के. लोन इस्पितळात गेल्या पाच दिवसांत आणखी १४ बालकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गेल्या डिसेंबर महिन्यात मृत बालक

पण लक्षात कोण घेतो?
राजस्थान : काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात
अघोषित आणीबाणीची ७ वर्षे

जयपूर : राजस्थानमधील कोटास्थित जे. के. लोन इस्पितळात गेल्या पाच दिवसांत आणखी १४ बालकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गेल्या डिसेंबर महिन्यात मृत बालकांची संख्या ९१ पर्यंत पोहचली आहे. हे सर्व मृत्यू न्यूमोनिया, मेंदूज्वर व श्वसन विकाराने झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असून या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारने स्थापन केलेल्या तीन डॉक्टरांच्या समितीचा अहवाल येत्या ४८ तासांत अपेक्षित आहे. या अहवालानंतर रुग्णालयाच्या निष्काळजीपणाची माहिती मिळेल असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात येत आहे.

या संदर्भात द वायरला मिळालेल्या माहितीनुसार लोन रुग्णालयातील बालकांच्या मृत्यूसंदर्भात चौकशी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव वैभव गैलरिया यांना कोटा येथे पाठवण्यात आले होते. त्यांनी रुग्णालयातील सेवांचा अभाव, ऑक्सिजनची व अन्य उपकरणांची कमतरता याकडे लक्ष वेधले होते. तरीही गेल्या पाच दिवसांत १४ बालकांचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

भाजपने पाठवली चार सदस्यांची समिती

दरम्यान राजस्थानमधील बालकांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्‌डा यांनी त्यांच्याच पक्षाच्या चार संसदीय सदस्यांची समिती राजस्थानमध्ये पाठवली आहे. या समितीत जसकौर मीना, लॉकेट चटर्जी, भारती पवार, कांता कर्दम यांचा समावेश आहे. ही समिती आपला अहवाल तीन दिवसांत भाजपकडे सोपवणार आहे.

भाजपने या प्रकरणी काँग्रेसच्या सरकारवरही निशाणा साधला आहे. त्यांनी नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण गहलोत सरकारच्या काळात वाढल्याचा आरोप केला आहे. या आरोपाला उत्तर देताना गहलोत यांनी भाजप सरकारच्या तुलनेत बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचा दावा केला आहे. राजस्थानमधील भाजपचे एक नेते व माजी आरोग्यमंत्री राजेंद्र सिंह राठोड व कालिचरण सराफ यांनी लोन इस्पितळाची पाहणी केली. हे दोघे नेते आपला अहवाल केंद्र सरकारला पोहचवणार आहेत.

वास्तविक कोटा लोकसभा मतदारसंघ भाजपचे सदस्य व सध्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा असून त्यांनी गेल्या रविवारी राज्य प्रशासनाला या प्रकरणाची चौकशी करावी अशी विनंती केली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0