पीटी उषा, इलया राजा, वीरेंद्र हेगडे, विजयेंद्र प्रसाद राज्यसभेवर

पीटी उषा, इलया राजा, वीरेंद्र हेगडे, विजयेंद्र प्रसाद राज्यसभेवर

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय माजी धावपटू पी. टी. उषा, जगप्रसिद्ध संगीतकार इलया राजा, दानशूर वीरेंद्र हेगडे व अनेक प्रसिद्ध तेलुगू चित्रपटांचे पटकथाकार के

भिन्न प्रकरणांत २ दलितांची हत्या; पोलिसांची उशीरा कृती
राज्यपालांना अनिर्बंध अधिकार नाहीत
‘यूपीएससी जिहाद’ कार्यक्रम मुस्लिमांची बदनामी’

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय माजी धावपटू पी. टी. उषा, जगप्रसिद्ध संगीतकार इलया राजा, दानशूर वीरेंद्र हेगडे व अनेक प्रसिद्ध तेलुगू चित्रपटांचे पटकथाकार के.व्ही विजयेंद्र प्रसाद या चार जणांची भाजपने राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या चौघांचा गौरव म्हणून तसेच या चार व्यक्ती दक्षिण भारतातील चार विविध राज्यांतल्या प्रतिभाशाली व्यक्ती असल्याने त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवर बुधवारी केली.

सरकारचे सबका साथ-सबका विकास हे ब्रीद असल्याने ज्या समुहाचे सत्तेत प्रतिनिधित्व कमी असते त्यांना सत्तेत सहभागी करण्याचा हा प्रयत्न असून राष्ट्रपतीनियुक्त या ४ नावांमध्ये एक महिला, एक दलित व एकजण धार्मिक अल्पसंख्याक समुहाचे (जैन समाज) प्रतिनिधित्व करणारा असेल असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

जगप्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा यांना राज्यसभेसाठी नियुक्त करताना त्यांचे मोदींनी अभिनंदन केले आहे. पी. टी. उषा प्रत्येक भारतीयासाठी आजही प्रेरणा आहे, त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान अमूल्य असून त्यांनी अनेक तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी मार्ग मिळवून दिला असा गौरव मोदींनी केला आहे.

इलाया राजा यांच्या नियुक्तीवरही मोदींनी त्यांचे अभिनंदन करत इलाया राजा यांची संगीतातील प्रतिभा ही अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करत आलेली आहे, त्यांच्या संगीतातल्या भावनाही जगण्यात आनंद निर्माण करतात, असे गौरवोद्गार काढले आहे. वीरेंद्र हेगडे यांचे आरोग्य, शिक्षण व संस्कृती क्षेत्रातील अमूल्य काम संसदीय लोकशाहीला अधिक समृद्ध करेल, अशा शुभेच्छा मोदींनी वीरेंद्र हेगडे यांना दिल्या आहेत. तर विजयेंद्र प्रसाद गारू यांच्या कलेने अनेक दशके चित्रपटसृष्टी समृद्ध होत गेली आहे, त्यांच्या प्रतिभेमुळे तेलुगू चित्रपटसृष्टीने जगात आपले स्थान निर्माण केल्याचे प्रशंसोद्गार मोदींनी काढले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: