ध्रुपद गायक गुंदेशा बंधुंवर लैंगिक छळाचा आरोप

ध्रुपद गायक गुंदेशा बंधुंवर लैंगिक छळाचा आरोप

रमाकांत गुंदेशा यांचे गेल्याच वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा भाऊ उमाकांत हे ध्रुपद संस्था पाहात आहेत. रमाकांत यांचे तिसरे बंधू म्हणून अखिलेश अध्यापनाचे काम करत आहेत.

गलवान खोरे : चीनचा दावा भारताने फेटाळला
एल्गार परिषदः ८ जणांवर एनआयएचे आरोपपत्र
कर्कविज्ञानाची सखोल गोष्ट

नवी दिल्लीः ध्रुपद गायकीतील प्रसिद्ध कलाकार रमाकांत गुंदेशा व अखिलेश गुंदेशा यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप युरोपमधील एका महिलेने केला. या महिलेच्या वतीने अमस्टरडॅमस्थित तिच्या योगशिक्षिकेने फेसबुकवरील ‘ध्रुपद फॅमिली युरोप’ या ग्रुपमध्ये हा आरोप केला आहे. पीडित महिलेला आपले नाव उघड करायचे नसल्याने तिच्यावतीने आपण ही पोस्ट केली असल्याचे या योगशिक्षिकेचे म्हणणे आहे.

रमाकांत गुंदेशा यांचे गेल्याच वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा भाऊ उमाकांत हे ध्रुपद संस्था पाहात आहेत. रमाकांत यांचे तिसरे बंधू म्हणून अखिलेश अध्यापनाचे काम करत आहेत.

रमाकांत गुंदेशा व अखिलेश गुंदेशा हे भोपाळमधील प्रसिद्ध ध्रुपद संस्था चालवतात. या संस्थेला युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा समितीने अधिकृत दर्जा दिल्याने युरोपमधील अनेक विद्यार्थी या संस्थेत शिकण्यासाठी येत असतात.

फेसबुकवरील पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, रमाकांत व अखिलेश यांनी अनेक महिला शिष्यांवर लैंगिक छळ केले असून या शिष्यांना धमक्या मिळत असल्याने त्यांनी मौन पाळले आहे. खुद्ध रमाकांत व अखिलेश या दोघांनीही याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही, याकडेही या पोस्टमध्ये लक्ष वेधण्यात आले आहे. संगीतातील करिअर चांगले करायचे असेल तर काही तडजोड करावी लागेल, असे हे दोघे शिक्षक महिला विद्यार्थ्यांना सांगत असतं व शिकवताना सतत महिलांच्या शरीराला स्पर्श करत असतं, असा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

या पोस्टमध्ये भारतातील विद्यार्थ्यांसंदर्भातही काळजी व्यक्त करण्यात आली आहे. ध्रुपद संस्थानमध्ये खेड्यापाड्यातील मुले शिकण्यासाठी येत असतात, त्यांना संगीतात करिअर करायचे असते म्हणून ते अशा अत्याचाराला बळी पडत आहेत. गुंदेशा बंधु हे अत्यंत प्रभावशाली असल्याने त्यांच्या शब्दाशिवाय संगीत कार्यक्रम मिळत नाहीत वा अशा कार्यक्रमात आपली कला सादर करता येत नाही, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ध्रुपद संस्थानचा खुलासा

दरम्यान लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर ध्रुपद संस्थानचे संचालक उमाकांत गुंदेशा यांनी एक पत्रक जारी केले असून या आरोपांची संस्थेची एक समिती चौकशी करेल. आणि या समितीचा अंतिम अहवाल येईपर्यंत या संस्थेच्या कोणत्याही कामकाजापासून अखिलेश यांना दूर ठेवण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंतांनी उमाकांत गुंदेशा यांनी आपला पदभार सोडावा अशी मागणी केली आहे.

प्रसिद्ध कर्नाटक संगीत गायक टी. एम. कृष्णा यांनी, अशा घटनेबाबत खुद्ध उमाकांत यांना कोणतीही खबरबात नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. अखिलेश यांच्याविरोधातील चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत उमाकांत यांनी संस्थेच्या संचालकपदावर राहू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. गुरु शिष्य परंपरा ही सुंदर आहे, ती राखली गेली पाहिजे, असे ते म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: