गोगोई यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस

गोगोई यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस

नवी दिल्लीः माझ्या मनात येईल तेव्हा मी संसदेत जाईन, हे वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यसभा सदस्य व माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात राज्यसभेतल्य

पदाचा दुरुपयोगः माजी सरन्यायाधीश रमणांविरोधात तक्रार
सुवर्ण पदक विजेत्या मुलीने सरन्यायाधीशांच्या हस्ते पदक घेणे नाकारले
सरन्यायाधीश बोबडे आणि शेतकरी संघटना

नवी दिल्लीः माझ्या मनात येईल तेव्हा मी संसदेत जाईन, हे वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यसभा सदस्य व माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात राज्यसभेतल्या तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदारांनी हक्कभंगाची नोटीस राज्यसभा सभापतींकडे दाखल केली आहे. राज्यसभेचा अवमान झाल्याचे हे विधान असून त्यामुळे हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आल्याचे जवाहर सिरकार व मौसम नुरी या दोघांचे म्हणणे आहे. ही नोटीस राज्यसभा कार्यालयाकडे पाठवली आहे.

राज्यसभेचे सदस्य झाल्यापासून ६८ बैठकांपैकी केवळ ६ बैठकांना गोगोई उपस्थित राहिले होते, त्यांच्या इतक्या अनुपस्थितीबाबत एनडीटीव्हीचे पत्रकार श्रीनिवासन जैन यांनी प्रश्न विचारला असता, गोगोई यांनी आपली राज्यसभेतील अनुपस्थिती मान्य केली पण ती मान्य करताना त्यांनी आपल्या प्रकृतीचे कारण सांगितले. कोविड-१९च्या नियमावलींमुळे व डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे आपण अनेक दिवस गैरहजर राहिल्याचे त्यांचे म्हणणे होते.

गोगोई पुढे म्हणाले संसदेत कोविड-१९ची नियमावली फारशी पाळली जात नव्हती. सदस्यांच्या बैठकीचे स्थानाबाबतही गैरसोय केली जात होती. ती आपल्याला योग्य वाटली नाही. मला जेव्हा राज्यसभेत जायचे वाटेल तेव्हा मी जाईन. हा काही महत्त्वाचा मुद्दा नाही. मी कोणत्या पक्षाचा सदस्य नाही की पक्षाने व्हीप काढला तर मला तेथे उपस्थित राहावे लागते. मी राष्ट्रपती नियुक्त सदस्य असून मी स्वतंत्र आहे. मला हवे तेव्हा मी तिथे उपस्थित राहीन, असे गोगोई म्हणाले.

गोगोई यांना सरन्यायाधीशानंतर राज्यसभा सदस्य झाला याबद्दल विचारले असताना त्यांनी वादग्रस्त मत व्यक्त केले. ते म्हणाले, राज्यसभेत असे काय वेगळे ठेवले आहे? मी ट्रायब्यूनल सदस्य असतो तर तेथे मला पगार, भत्ते राज्यसभेच्या सदस्यापेक्षा अधिक मिळाले असते. मी राज्यसभेतून एकही पैसा घेत नाही, असे अन्य एक विधान केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0