राष्ट्रपती भवनातील ११५ कुटुंबे विलिगीकरणात

राष्ट्रपती भवनातील ११५ कुटुंबे विलिगीकरणात

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील एका सफाई कर्मचार्याच्या नातेवाईकाला कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याचे कळल्यानंतर या परिसरात राहणार्या ११५ कुटुंबांना वि

आता धास्ती ‘बी वन वन सेव्हन’ची!
कोरोनाकाळातील आश्वासक शिवसेना
सर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे!

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील एका सफाई कर्मचार्याच्या नातेवाईकाला कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याचे कळल्यानंतर या परिसरात राहणार्या ११५ कुटुंबांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

रायसिना हिल्स ते साऊथ अवेन्यू हा सुमारे ३३० एकर क्षेत्रफळाचा परिसर असून त्यात राष्ट्रपती भवन आहे. या परिसरात सुमारे हजार कुटुंबे राहतात. या कुटुंबांकडे राष्ट्रपती भवनातील ३४० खोल्या, अशोक हॉल, दरबार हॉलसहित संपूर्ण परिसराची देखभाल व अन्य कामांचे वाटप केले गेले आहे.

१३ एप्रिल रोजी बीएल कपूर इस्पितळात एका कोरोना संक्रमित रुग्णाचा मृत्यू झाला पण ही व्यक्ती राष्ट्रपती सचिवालय किंवा राष्ट्रपती भवनात कोठेही कामास नाही. पण या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी जी व्यक्ती गेली तिचा संपर्क मृत रुग्णाशी आला होता व नंतर तिच्यामध्ये कोरोनाचे संक्रमण आढळून आले होते. पण संक्रमित व्यक्ती राष्ट्रपती भवनातील कर्मचारी नव्हती पण या व्यक्तीचा एक नातलग राष्ट्रपती भवनातील कर्मचारी असल्याने खबरदारी म्हणून ११५ कुटुंबांना विलगीकरणात ठेवले गेले आहे.

राष्ट्रपती भवनाने एक प्रसिद्ध पत्रक जारी केले असून त्यात राष्ट्रपती सचिवालयात काम करणार्या एकाही कर्मचार्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. राष्ट्रपती सचिवालय स्थानिक प्रशासन व सरकारी निर्देशानुसार कोरोनासंदर्भात सर्व खबरदारीचे उपाय पाळत असल्याचेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ज्या व्यक्तीला कोरोना संक्रमण झाले आहे, त्या व्यक्तीच्या घरातील ११ सदस्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: