रविदास मंदिर : मुस्लिम, दलितांचे १५ सप्टेंबरला आंदोलन

रविदास मंदिर : मुस्लिम, दलितांचे १५ सप्टेंबरला आंदोलन

दिल्ली विकास प्राधिकरणाने (DDA) १० ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून मंदिर पाडले होते.

आरोग्य सेवेत मुस्लिम, दलित-आदिवासींशी भेदभाव
उत्तर प्रदेशात दलित मतांची भाजपकडे वाटचाल
‘दलित दहशतवाद’ : एनआयएचा शोध

नवी दिल्ली : तुघलकाबाद वन क्षेत्रातील रविदास मंदिर पुन्हा बांधले जावे या दलित समुदायाच्या मागणीला अनेक मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दर्शविला आहे. १५ सप्टेंबर रोजी राजधानीमध्ये ते एकत्रितपणे निषेध मोर्चाचे आयोजन करतील असेही त्यांनी सांगितले आहे.

दिल्ली विकास प्राधिकरणाने (DDA) १० ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून मंदिर पाडले होते.

२१ ऑगस्ट रोजी देशाच्या राजधानीमध्ये या मुद्द्यावरून चालू असलेल्या प्रचंड आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद आणि इतर ९५ जणांना दंगलीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

एका वार्ताहर परिषदेमध्ये बोलताना लखनौ येथील टीले वाली मस्जिदचे इमाम मौलाना फजलुल मनन शाही म्हणाले, “मंदिर पाडल्यामुळे होणारे दुःख आम्ही समजू शकतो, कारण आम्हालाही असा अनुभव आला आहे. आम्ही आमच्या दलित बांधवांच्या दुःखात सहभागी आहोत. मंदिर पुन्हा बांधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे एक सदस्य मुफ्ती ऐजाज अर्शद कासमी म्हणाले, “जर सरकारने मंदिर पुन्हा बांधले नाही तर १५ सप्टेंबर रोजी आम्ही रस्त्यावर उतरू. आम्हाला शक्य ते सर्व आम्ही करू. आम्ही कायदेशीर मार्गांचाही अवलंब करू.”

अंजुमन-ए-हैदरीचे सर्वसाधारण सचिव सय्यद बहादुर अब्बास नकवी यांनी आरोप केला, “सरकारने मंदिराच्या जागेच्या अधिग्रहणाबद्दलचे चुकीचे कागदपत्र सादर करून सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली.”

“कायद्याप्रमाणे, कोणत्याही धार्मिक स्थळाची जमीन अधिग्रहित करता येत नाही. सरकारने १९८६ साली अशी जमीन अधिग्रहित केली. १९८६ पूर्वीही मंदिर अस्तित्वात होते हे सिद्ध करणारा पुरेसा पुरावा आहे.” त्यांनी दावा केला.

“या मुद्द्यावर मुस्लिम आणि दलित समुदाय एकमेकांच्या बरोबर आहेत. मंदिर त्याच्या मूळ जागीच बांधले जावे, तसेच चुकीच्या आरोपांखाली अटक केलेल्या आझाद आणि त्याच्या समर्थकांना त्वरित मुक्त करावे,” अशा मागण्या आम्ही करत आहोत,” नकवी म्हणाले. १५ सप्टेंबरला मुस्लिम समुदाय शांतपणे तुघलकाबाद येथे ज्या ठिकाणी मंदिर होते त्या जागेकडे शांतपणे मोर्चा घेऊन जातील असेही नकवी म्हणाले.

(पीटीआय)

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: