धर्म बदलला तरी जात बदलत नाहीः मद्रास हायकोर्ट

धर्म बदलला तरी जात बदलत नाहीः मद्रास हायकोर्ट

नवी दिल्लीः धर्मांतर केले तरी एखाद्याची जात बदलत नाही, असा निर्वाळा बुधवारी एका खटल्यात मद्रास उच्च न्यायालयाने दिला. एस. पॉल राज या व्यक्तीने दाखल

‘सिरीयस’, ‘कॅज्युअल’ आणि जातीची जाणीव
जात नको आर्थिक निकषावर आरक्षण मागा – केरळच्या न्यायाधीशांचे ब्राह्मणांना आवाहन
प्रतिनिधीशाही, निवडणुका आणि मतदार

नवी दिल्लीः धर्मांतर केले तरी एखाद्याची जात बदलत नाही, असा निर्वाळा बुधवारी एका खटल्यात मद्रास उच्च न्यायालयाने दिला.

एस. पॉल राज या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्या. एस. एम. सुब्रह्मण्यम यांनी धर्म बदलला तरी जात बदलली जाऊ शकत नाही, असा निर्णय दिला.

एस. पॉल राज हे मूळचे अदि द्राविदार जातीचे असून त्यांचा विवाह हिंदू अरुणथाथियार जातीतील जी. अमृथा यांच्याशी झाला होता. या दोघांच्या जाती अनुसूचित जाती आहे. पण एस. पॉल राज यांनी ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केले त्या आधी त्यांनी आंतरजातीय विवाह प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. या अर्जानुसार त्यांना मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले होते.

तामिळनाडूत अनु.जाती/जमातीमधील विवाह, अन्य जातीमधील विवाह वा अन्य मागासवर्गीय जातीतील विवाहाला आंतरजातीय विवाह म्हणून मान्य केले जाते. असा विवाह केल्यास राज्य सरकारच्या अनेक सवलती, नोकरी मिळते.

एस. पॉल. राज यांनी जेव्हा आपल्या विवाहानंतर मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र द्यावे म्हणून सालेम जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला तेव्हा प्रशासनाने दोघेही पती-पत्नी अनु. जातीमधील असल्याने त्यांनी धर्म बदलला म्हणून त्यांना मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र देता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यावर राज यांनी न्यायालयात धाव केले.

राज यांच्या वकिलाने तामिळनाडू सरकारच्या २८ डिसेंबर १९७९ सालच्या GOM No. 188 या आदेशाचा दाखला देत राज यांची पत्नी अनु.जाती/जमातीतील असल्याने या दाम्पत्याला मागासवर्गीय जातीचे प्रमाण पत्र द्यावे अशी न्यायालयाला विनंती केली.

पण सरकारच्या वतीने सी. जयप्रकाश या वकिलांनी २१ जुलै १९९७साली सामाजिक कल्याण विभागाने २५४ क्रमांकाच्या एका आदेशाचा दाखला देत धर्मांतरण केल्यामुळे आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र देण्याचा सवाल उपस्थित होत नाही, असा युक्तिवाद न्यायालयात केला.

न्यायालयाने यावर राज यांची याचिका फेटाळली व त्यांना आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र देता येणार नाही, असा आदेश जारी काढला. दोघेही पती-पत्नी अनु.जातीमधील असल्याने व त्यांचा जन्मच अनु. जातीमध्ये झाल्याने धर्म बदलला तरी जात बदलता येत नसल्याने त्यांना आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: