प्रख्यात छायाचित्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानात ठार

प्रख्यात छायाचित्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानात ठार

काबूलः आंतरराष्ट्रीय पत्रकारितेतला प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार विजेते व रॉयटर्स या वृत्तसंस्थेचे छायाचित्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानातील यादवीचे

अफगाणिस्तान ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्णः तालीबान
मुल्ला बरादरकडे अफगाणिस्तानची सूत्रे जाण्याची शक्यता
काबूलमध्ये बॉम्बस्फोट २५ शीख भाविक ठार

काबूलः आंतरराष्ट्रीय पत्रकारितेतला प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार विजेते व रॉयटर्स या वृत्तसंस्थेचे छायाचित्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानातील यादवीचे वृत्तांकन करताना शुक्रवारी ठार झाले. अफगाणिस्तानाचे सैनिक व तालिबान दहशतवादी यांच्या दरम्यान कंदहार येथे चकमक सुरू होती. या यादवीचे वृत्तांकन करण्यासाठी सिद्दीकी तेथे गेले होते. या संघर्षात ते व आणखी एक अफगाणी अधिकारी ठार झाल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

अफगाणिस्तानच्या कंदहार जिल्ह्यातील स्पिन बोल्डक येथील मुख्य बाजारपेठेवर कब्जा करण्यासाठी अफगाण सैन्य व तालिबान यांच्यात सध्या संघर्ष सुरू आहे. अमेरिकेचे अफगाणिस्तानातील सैन्य माघारी जात असल्याने अफगाणिस्तानच्या बहुसंख्य भागावर ताबा घेण्यासाठी तालिबान सरसावले आहेत. सध्या तालिबानचा स्पिन बोल्डक बाजारपेठ ताब्यात घेण्यासाठी अफगाणिस्तान सैन्याशी जोरदार संघर्ष सुरू आहे. या संघर्षाचे वृत्तछायांकन करताना ते ठार झाल्याचे अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासाने शुक्रवारी जाहीर केले.

दानिक सिद्दीकी हे मुळचे मुंबईचे रहिवासी होते. पण दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातून पदवी मिळवली होती. २००७मध्ये त्यांनी जामियातून मास कम्युनिकेशनचीही पदवी घेतली होती. नंतर २०१०मध्ये ते रॉयटर्समध्ये रुजू झाले होते.

दानिश सिद्दीकी कंदहारमध्ये अनेक दिवस मुक्काम टाकून होते. त्यांची चार दिवसांपूर्वीच बातमी प्रसिद्ध झाली होती. कंदहार जिल्ह्यात आक्रमक तालिबानने अफगाणिस्तान सैन्यादरम्यान घनघोर संघर्ष सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या हाताला गोळी लागल्याचेही त्यांनी रॉयटर्सला सांगितले होते. स्पिन बोल्डक येथून तालिबानची माघारी लक्षात आल्यानंतर हातावर इलाज केला असे त्यांनी रॉयटर्सला कळवले होते. पण शुक्रवारी चकमकीत त्यांना दुर्दैवी मृत्यू आला.  दानिश सिद्दीकी रॉयटर्सच्या भारतमधील मल्टिमीडिया टीमचे नेतृत्व करत होते. त्यांची भारतातील वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, कोरोना महासाथ, लॉकडाऊन संदर्भातील अनेक छायाचित्रे जगभरात वाखाण्यात आली होती.

कोरोनाच्या दुसर्या लाटेतील गंगा नदीच्या किनार्यावर जळत असलेल्या शेकडो मृतदेहांवरच्या अंत्यसंस्कारचे ड्रोन कॅमेराद्वारे घेतलेल्या छायाचित्रांनी जगभर खळबळ माजवली होती. या छायाचित्रांनी मोदी सरकारच्या कोरोना संदर्भातील दाव्यांमधील पोकळपणा जगापुढे आला होता.

पुलित्झर पुरस्कार

२०१८मध्ये म्यानमार सीमेवरील रोहिंग्या निर्वासितांच्या हालअपेष्टांचे त्यांनी केलेले वृत्तांकन जगभरात चर्चिले गेले. त्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला होता.

रॉयटर्स अगोदर त्यांनी द गार्डियन, न्यू य़ॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन टाइम्स, अल जझिरा व अन्य वृत्तसंस्थांसाठी काम केले होते. त्यांची छायाचित्रे अनेक देशी-विदेशी नियतकालिकांमध्ये, मासिकांमध्ये व वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती.

२०१०नंतर सिद्दीकी यांनी अफगाणिस्तान व इराकमध्ये युद्धवार्तांकन केले. नंतर ते रोहिंग्या निर्वासितांवरचे संकट, हाँगकाँगमधील चीनच्या सत्तेविरोधातील विद्यार्थ्यांची निदर्शने, नेपाळमधील भूकंप यांचेही वार्तांकन केले होते.

मूळ बातमी 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: