पंजाबात २२ शेतकरी संघटनांचा राजकीय पक्ष स्थापन

पंजाबात २२ शेतकरी संघटनांचा राजकीय पक्ष स्थापन

चंदीगडः वादग्रस्त तीन शेती कायद्यांविरोधात सक्रीय असलेल्या संयुक्त किसान मोर्चा या आघाडी संघटनेतल्या २२ शेतकरी संघटनांनी आगामी पंजाब विधानसभा निवडणुका

एमी बँरेटच्या नियुक्तीने मूलतत्ववाद्यांना बळ
न्यूज पोर्टल, ओटीटीवर सरकारची नजर
विरोधी पक्षनेतेपदाचा पेच

चंदीगडः वादग्रस्त तीन शेती कायद्यांविरोधात सक्रीय असलेल्या संयुक्त किसान मोर्चा या आघाडी संघटनेतल्या २२ शेतकरी संघटनांनी आगामी पंजाब विधानसभा निवडणुका लढणार असल्याचे जाहीर केले आहे. पण या निवडणुकांतून मुख्य शेतकरी संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने स्वतःला मात्र निवडणुकांच्या रिंगणाबाहेर ठेवले आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या या भूमिकेमुळे शेतकरी संघटनांच्या भूमिकेत फूट पडल्याचे दिसून येत आहे. संयुक्त किसान मोर्चाने आपल्या संघटनेचे चिन्ह अथवा फलक निवडणूक प्रचारात वापरायचे नाही असे या २२ संघटनांच्या आघाडीला सांगितले आहे.

राजकारणात प्रत्यक्ष उतरायचे नाही, अशी पूर्वी संयुक्त किसान मोर्चा व त्यात सामील असलेल्या शेतकरी संघटनांची भूमिका होती. पण आता शेती कायदे मागे घेतल्यानंतर संघटनांनी राजकारणात उतरण्याचा अनपेक्षित असा निर्णय घेतला आहे.

निवडणूक लढवणाऱ्या संघटनेचे नाव संयुक्त समाज मोर्चा असे ठेवण्यात आले असून त्याचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी शनिवारी शेतकरी संघटना पंजाब विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. ज्या २२ शेतकरी संघटना निवडणुका लढणार आहेत, त्यांचा आम आदमी पार्टीशी संपर्क असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. पण या वृत्तात काही तथ्य नसल्याचे राजेवाल यांचे म्हणणे आहे. राजेवाल हे संयुक्त समाज मोर्चाचा चेहरा आहेत.

संयुक्त समाज मोर्चा पंजाबातील सर्व ११७ विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. ही संघटना देशातील सर्व शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करेल असाही या संघटनेने दावा करण्यास सुरूवात केली आहे.

दोन दिवसांपूर्वी हरियाणास्थित भारतीय किसान युनियनचे नेते गुरुनाम सिंग चडुनी यांनी स्वतःचा पक्ष संयुक्त संघर्ष पार्टी स्थापन केली होती, त्यानंतर शेतकऱ्यांचा हा दुसरा राजकीय पक्ष आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0