रिहाना, ग्रेटाचे एक ट्विट व हादरले सरकार

रिहाना, ग्रेटाचे एक ट्विट व हादरले सरकार

केंद्रातील सरकार पाश्चिमात्य जगतातील टीकेमुळे हादरले व त्यांना असुरक्षितता वाटली.

‘लाडावलेला मुलगा’ कोण?
विना वॉरंट घराची झडतीः शांतनूच्या वडिलांचा आरोप
श्रीमंत शेतकरी.. आंतररराष्ट्रीय कारस्थान.. मूर्खपणा

जगप्रसिद्ध पॉप गायिका रिहाना हिच्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थच्या एका ट्विटमुळे जगभरातला सोशल मीडिया एकदम जागा झाला. २ फेब्रुवारीला भारतीय वेळेनुसार रात्री ८.५२ मिनिटांनी रिहानाने सीएनएन या वृत्तवाहिनीच्या वेबसाइटवरचे दिल्ली आंदोलनासंदर्भातले एक वृत्त ट्विटरवर शेअर केले आणि भडका उडाला.

सीएनएनने दिल्लीत शेतकरी आंदोलन करत असताना, पोलिसांशी संघर्ष सुरू असताना शेतकर्यांची इंटरनेट सुविधा काढून घेतली असे वृत्त प्रसिद्ध केले, त्या वृत्तावर रिहानाने, ‘या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत का?’ असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर रिहानाचे ट्विट काही तासांत जगभरात एक लाखाहून अधिक जणांनी रिट्विट  केले व २ लाख जणांनी ते ‘लाइक’ केले.

रिहानाच्या ट्विटचा परिणाम एका ऊर्जेसारखा सोशल मीडियात दिसून आला. ब्रिटनचे खासदार क्लॉडिया वेब, तमन्नजीत सिंग धेसी, अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य जिम कॉस्टा, हवामान बदलावर जगभर जागृती करणारी पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकर्यांच्या आंदोलनाबाबत सहानुभूती दाखवली व त्याचे समर्थन केले. रिहानाच्या ट्विटनंतर मीना हॅरीस यांनी फॅशिस्ट हुकुमशहांच्याविरोधात मौन बाळगल्यांबद्दल सावधानता हवी असे मत व्यक्त केले. मीना हॅरिस या अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या भाची असून त्या लोकप्रिय लेखिकाही आहेत.

वास्तविक रिहानाच्या ट्विटमुळे तसा फरक पडायला नको होता पण जगाने त्याची दखल घेतली आणि उजव्या कट्टरवाद्यांनी रिहानावर अश्लाघ्य भाषेत टीका, टिप्पण्णी सुरू केली. उजव्या विचारधारांच्या आयटी सेलकडून २४ तास रिहानाच्या प्रतिमेला कलंकित करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न झाले. आयटी सेलने २००९चा रिहानासंदर्भातला घरगुती हिंसाचाराचा एक व्हिडिओ व्हायरल केला. या व्हीडिओतून रिहानावर झालेले अत्याचार योग्य होते, तिला योग्य तो धडा शिकवायला हवा, असा प्रचार आयटी सेलकडून सुरू झाला. रिहाना मुस्लिम असल्यापासून वंशद्वेषावर आधारित गुलामगिरीचे समर्थन करण्यापर्यंत आयटी सेलचा प्रचार होता.

द प्रिंट या न्यूज पोर्टलने रिहानाच्या ट्विटमुळे सोशल मीडियात खडाजंगी सुरू झाल्याचे सांगत आपल्या ‘50 वर्ड एडिट’मध्ये ट्विटर वरच्या काही ट्विटचा दाखला दिला. ‘रिहानाने भारतीय लोकशाही समजण्याचा क्रॅश कोर्स करण्याची गरज असून ती पैसे घेऊन ट्विट करणारी सेलेब्रिटी आहे. जगभरातील डाव्यांच्या कंपूतील असल्याचा आरोप यात होता’. द प्रिंटचे ‘50 वर्ड एडिट’ ट्विटरवर प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली. या टिकेवर उत्तर देताना आम्ही फक्त ट्विटरवरची मते प्रसिद्ध केली असा युक्तिवाद त्यांनी केला व ट्विट काढून टाकले. पण द प्रिंटने आपण प्रसिद्ध केलेला मजकूर ट्विट आहे, असा उल्लेख केला नव्हता. ते त्यांचे मत म्हणून प्रसिद्ध झाले.

फर्स्ट पोस्टने एक लेख प्रसिद्ध करताना रिहाना व ग्रेटा थनबर्गचे गेल्या काही काळातले ट्विट व मलालाचे जुने ट्विट प्रसिद्ध केले. त्यात परकीय अदृश्य हात देशाची एकता अस्थिर करत असल्याचा दावा करण्यात आला.

रिहानाच्या ट्विटचा परिणाम व धक्के परराष्ट्र खात्यालाही बसले. सरकारने तातडीने एक प्रसिद्धी पत्र जाहीर करून भारतातील शेतकरी देशाचा एक अविभाज्य भाग असून त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्याचे हरप्रकारे प्रयत्न सरकारकडून केले जात आहे व त्यावर उत्तरही मिळत आहे. अशावेळी फूट पाडणार्या वक्तव्यांकडे लक्ष न देता सौहार्दपूर्ण वातावरण राहावे व त्याचे समर्थन करावे, अशी विनंती केली. यासाठी परराष्ट्र खात्याने #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda…” असा हॅशटॅगही लावला होता.

त्यानंतर सरकारच्या समर्थनार्थ सुनील शेट्टी, एकता कपूर, करण जोहर अशी सेलेब्रेटिंनी ट्विट केले. आपली एकनिष्ठता त्यांनी दाखवून दिली.

रिहानाच्या ट्विट अगोदर डिसेंबरमध्ये अमेरिकेतील ७ कायदे प्रतिनिधींनी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पपिओ यांना एक पत्र पाठवून भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी ट्रम्प सरकारने काही पावले उचलली नाहीत. तर नव्या बायडन प्रशासनाने या विषयावर आपले व्यापक हितसंबंध पाहून अजून पावले उचललेली नाहीत. २३ जानेवारीला अमेरिकेतील सीख-अमेरिकन ह्युमन राइट्स दबाव गटाने दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला बायडन सरकारने पाठिंबा द्यावा अशी विनंती केली होती.

बायडन हे ट्रम्पपेक्षा वेगळे असले तरी भारतासंबंधी अमेरिकेचे जे पारंपरिक परराष्ट्रीय धोरण (ओबामा राजवटीतले) आहे त्यात बदल होईल असे फारसे वाटत नाही. या पार्श्वभूमीवर मीना हॅरिस व जीम कॉस्टा यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरते.

पण सोशल मीडियातील प्रतिक्रियांमुळे परराष्ट्र खात्याने, ‘घर की बात घर के अंदर रहनी चाहिए’, अशी एक दुरुस्ती केली. या पवित्र्याने असे दिसून आले की सरकार पाश्चिमात्य जगतातील टिकेमुळे हादरले व त्यांना असुरक्षितता वाटली. तर दुसरीकडे रिहाना व ग्रेटा थनबर्ग यासारख्या प्रभावशाली व्यक्तिंमुळे माहितीचा महापूर देश-सीमा ओलांडून सगळीकडे वाहत गेला.

रिहानाच्या ट्विटमुळे जग बोलायला लागले असे आपण गृहित धरल्यास- (रिहानाचे १० कोटी ट्विटर फॉलोअर आहेत) ते मिशन पूर्णत्वास गेले असे म्हणता येईल. रिहाना, ग्रेटाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करूनही या दोघींचे पाठिराखे त्यांच्यासोबत राहिले.

हे जग एकाच वेळी आभासी व वास्तवात वावरत असताना दोघांवरही समान परिणाम होऊ शकतो. जेव्हा सक्षम विरोधी पक्ष नेते शेतकर्यांच्या सोबत नसतात तेव्हा अशी विधाने करणे ही कठीणप्राय बाब असते.

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये दीपिका पडूकोण जेएनयू विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ घटनास्थळी उपस्थित राहिली होती व तिने आंदोलकांच्या लढ्यासोबत असल्याचा संदेश दिला होता. त्या प्रसंगाने विद्यार्थी चळवळीला बळ आले होते.

शेतकरी आंदोलनात मात्र अद्याप तसे दिसून आलेले नाही. दोन महिन्याहून अधिक काळ हे आंदोलन सुरू आहे, पण सेलेब्रिटी यापासून दूर आहेत.

रिहानाने एका मोठ्या मनोरंजन उद्योगाचा दबाव टाकला आहे पण बॉलीवूडच्या सेलेब्रिटींनी स्वतःला अजूनही सिनेमा हॉलमध्ये कोंडून घेतले आहे.

अक्क्षिता माथूर, या ‘द वायर’च्या सोशल मीडिया संपादक असून किरन लोबो हे संशोधक आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0