डीआरडीओतल्या शास्त्रज्ञाकडून दिल्ली कोर्टात बॉम्बस्फोट

डीआरडीओतल्या शास्त्रज्ञाकडून दिल्ली कोर्टात बॉम्बस्फोट

नवी दिल्लीः राजधानीतील रोहिणी कोर्टमध्ये ८ डिसेंबरला करण्यात आलेला कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट डीआरडीओमधील एका शास्त्रज्ञाने केल्याची माहिती उघडकीस आली आ

इस्रायल दुतावास स्फोटः ४ जणांना जामीन
काबुल विद्यापीठात दहशतवादी हल्ला, २५ ठार
जम्मूत लष्कराच्या हवाई तळावर ड्रोन हल्ला

नवी दिल्लीः राजधानीतील रोहिणी कोर्टमध्ये ८ डिसेंबरला करण्यात आलेला कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट डीआरडीओमधील एका शास्त्रज्ञाने केल्याची माहिती उघडकीस आली आहे. आपल्या शेजारी राहणार्या वकिलाला धडा शिकवण्यासाठी या शास्त्रज्ञाने बॉम्बस्फोट घडवून आणला असे दिल्ली पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले.

रोहिणी कोर्टात स्फोट झाल्यानंतर हे प्रकरण गंभीर असल्याने दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपवला. या पथकाने तपास केला असता ८ डिसेंबरला कोर्टात आलेल्या १ हजार गाड्यांची माहिती मिळवण्यात आली. त्याच बरोबर १०० सीसीटीव्ही कॅमेर्यातील हजाराहून अधिक फुटेज तपासण्यात आले. जो डेटा नव्हता तोही तपासण्यात आला. ८ डिसेंबरला कोर्टात जेवढी प्रकरणे सुनावणीसाठी होती, त्यांची चौकशी करण्यात आली.

बॉम्ब बनवण्यासाठी जे साहित्य वापरण्यात आले होते ते साहित्य बाजारात सहज उपलब्ध होते. बॉम्बमधील डिटोनेटरचा स्फोट झाला होता, पूर्ण स्फोटके जशीच्या तशी होती. जर पूर्ण बॉम्ब फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला असता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. स्फोट घडवण्यासाठी रिमोट कंट्रोलचा वापर करण्यात आला होता. असा रिमोट कंट्रोल कारमध्ये वापरण्यात येतो, असेही तपासातून निष्पन्न झाले

घटनास्थळी पोलिसांना एक बॅग मिळाली, या बॅगेत काही फाइली मिळाल्या. या बॅगेवरचा लोगो मुंबईतील एका कंपनीचा होता. त्या कंपनीचे गोदाम दिल्लीमध्ये होते. त्या कंपनीकडे चौकशी केल्यानंतर महत्त्वाची माहिती मिळाली. या चौकशीतून पोलिसांनी भूषण कटारिया या डीआरडीओतील शास्त्रज्ञाला ताब्यात घेतले.

पोलिसांना कटारिया यांच्या घरातून बॉम्ब निर्मितीचे बरेचसे साहित्य मिळाले. कटारिया डीआरडीओमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहेत.

ज्या दिवशी बॉम्बस्फोट घडवण्यात आला तेव्हा भूषण कटारिया यांनी वकिलाचा वेष घातला होता व दोन बॅगा त्यांनी वेगवेगळ्या गेटमधून कोर्टात नेल्या होत्या. स्फोट झाल्यानंतर कटारिया कोर्टातून बाहेर पडले होते.

कटारिया यांचे अमित बक्शी या वकिलाशी वाद चालू होता. दोघांनी एकमेकांवर केस दाखल केल्या आहेत. कटारियांच्या बक्शी यांच्यावर ५ तर बक्शी यांच्या कटारियांवर ७ केस आहेत. बक्शी यांना ठार मारण्यासाठी कटारिया यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. या स्फोटावेळी बक्शी न्यायालयात हजर होते, अशी पोलिसांनी माहिती दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: