युक्रेनवरचे हल्ले कमी करण्याची रशियाची तयारी

युक्रेनवरचे हल्ले कमी करण्याची रशियाची तयारी

इस्तंबुलः युक्रेनवर सुरू असलेल्या लष्करी कारवाईचा वेग कमी करत शांततेसाठी चर्चा करण्यास रशिया राजी झाला आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर व उत्तरे

अमेरिका आणि खडाखडी
सोव्हिएत नेते मिखाईल गर्बाचोफ यांचे निधन
रशियाशी चर्चा करण्यास बायडेन यांची ‘तत्त्वत:’ मान्यता

इस्तंबुलः युक्रेनवर सुरू असलेल्या लष्करी कारवाईचा वेग कमी करत शांततेसाठी चर्चा करण्यास रशिया राजी झाला आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर व उत्तरेकडील शहर चेर्नीहिव्ह या दोन शहरांवरचे आपले हल्ले कमी करणार असल्याचेही जाहीर केले. रशियाच्या या भूमिकेबरोबरच युक्रेननेही आपला देश कोणत्याही गटात जाणार नाही व तो तटस्थ राहील अशी भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. युक्रेनतर्फे वाटाघाटी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी युक्रेन कोणत्याही देशांच्या संघटनांचा सभासद होणार नाही वा युक्रेनमध्ये अन्य देशांचा लष्कर तळ होऊ देणार नाही असे आश्वासन दिले आहे. पण या बदल्यात युक्रेनच्या संरक्षणाची हमी आम्हाला देण्यात यावी, अशीही मागणी युक्रेनने केली आहे.

मंगळवारी इस्तंबुलमध्ये रशिया व युक्रेनदरम्यान बोलणी सुरू झाली आहे. गेल्या २४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. त्यानंतर परिस्थिती चिघळली होती.

युक्रेनला ही हमी इस्रायल, नेटो गटातील कॅनडा, पोलंड व तुर्कीकडून हवी आहे.

दरम्यान रशियाचे उपसंरक्षणमंत्री अलेक्झांडर फोमिन यांनी कीव व चेर्नीहिव्हवरील लष्करी हल्ल्यांची तीव्रता कमी केली जाईल व चर्चा सुरू व्हावी असे म्हटले आहे. रशिया व युक्रेनमध्ये बोलणी होण्यासाठी रशियातर्फे व्लादिमीर मेदिन्स्की यांची नियुक्ती झाली असून ते आपल्या चर्चेचा अहवाल थेट रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सादर करणार आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0