‘मलाही जातीय शक्तींना गोळ्या घालायच्या आहेत’

‘मलाही जातीय शक्तींना गोळ्या घालायच्या आहेत’

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा प्रचारादरम्यान जी घोषणा जमावापुढे केली तीच घोषणा – देश के गद्दारोंको, गोली मा

भाजपच्या एकाच म्यानात दोन तलवारी
’तो देव, मी त्याचा प्रेषित’ : मानवी संस्कृतीचा उदयकाळ आणि अर्वाचीन राजकारण
रजनीकांत यांचा राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा प्रचारादरम्यान जी घोषणा जमावापुढे केली तीच घोषणा – देश के गद्दारोंको, गोली मारो सालों को’, मला शांततेत देशातील जातीयवादी शक्तींना उद्देशून द्यायची आहे, त्यासाठी आंदोलनाची परवानगी द्यावी अशी विनंती साकेत गोखले या सामाजिक कार्यकर्त्याने दिल्ली पोलिसांना केली आहे. माझे हे आंदोलन कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही आणि या आंदोलनातून निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा कोणताही भंग होत नाही. येत्या २ फेब्रुवारी रोजी सुमारे १०० नागरिकांना माझ्यासह जंतरमंतर येथे आंदोलनास परवानगी द्यावी अशी विनंती गोखले यांनी पोलिसांना केली आहे. तुम्ही यावर निर्णय घ्या, तो तुमचा अधिकार असल्याचेही गोखले यांनी ट्विटवर दिल्ली पोलिसांना उद्देशून म्हटले आहे.

आपल्या या अनोख्या आंदोलनामागचा हेतू सांगताना गोखले यांनी देशातील जातीयवादी शक्तींना प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्याचे सांगितले. माझ्या दिल्ली पोलिसांपुढच्या अटीमुळे पेच निर्माण झाला असून त्यांनी मला परवानगी दिल्यास त्यांना पुढे न्यायालयात मला दिलेल्या परवानगीच्या समर्थनार्थ युक्तीवाद करावा लागेल किंवा त्यांनी परवानगी नाकारल्यास त्यांना अनुराग ठाकूर यांना अटक करावी लागेल, असे ते म्हणाले.

अनुराग ठाकूर यांना निवडणूक आयोगाची नोटीस

दरम्यान मंगळवारी निवडणूक आयोगाने अनुराग ठाकूर यांच्या भडकाऊ भाषणाची दखल घेत त्यांना येत्या गुरुवारी दुपारपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. अनुराग ठाकूर यांच्या भडकाऊ घोषणाबाजीसंदर्भातील अहवाल दिल्ली निवडणूक आयोगाने मागितला होता त्यानंतर त्यांना उत्तर देण्याची नोटीस आयोगाने बजावली आहे. .

सोमवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीतील रिठाला विधानसभा मतदारसंघात एका जाहीर सभेत ‘गद्दारांना गोळी मारा’ या जमावाला भडकवणाऱ्या घोषणेचा आधार घेतला. अनुराग ठाकूर मंचावरून ‘देश के गद्दारोंको’ असा नारा देत होते व त्याला उपस्थित भाजप कार्यकर्ते ‘गोली मारो सालों को’, असे उत्तर देत होते. आपल्या आवाहनाला उपस्थितांनी अधिक

अनुराग ठाकूर

अनुराग ठाकूर

जोरदार प्रतिसाद द्यावा यासाठी अनुराग ठाकूर मंचावर बसलेले आणखी एक केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांना, ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात घोषणा द्या, असेही उपस्थित कार्यकर्त्यांना उद्युक्त करताना दिसत होते.

अनुराग ठाकूर यांच्या या घोषणा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला शांततामय विरोध करणाऱ्या आंदोलकांच्या विरोधात होत्या. त्यांनी आपल्या भाषणात या कायद्याला विरोध करणाऱ्यांवर टीका केली.

दरम्यान अनुराग ठाकूर आपल्या भडकाऊ घोषणाबाजीने अडचणीत आले असले तरी त्यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मी घोषणा देत नव्हतो तर प्रेक्षकांमधून घोषणा दिल्या जात होत्या असे सांगितले. मी उपस्थितांना देशद्रोह्यांना काय करावे हे विचारत होतो आणि प्रेक्षक त्याला प्रतिसाद देत होते. उपस्थितांच्या म्हणण्याचा अर्थ विरोधकांना मते देऊ नका किंवा त्यांना सत्तेतून उखडून टाका असा होता, पण तो उपस्थित जमावाकडून आलेला प्रतिसाद होता, अशी सारवासारव त्यांनी केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0