२ कोटी १० लाख नोकरदार बेरोजगार

२ कोटी १० लाख नोकरदार बेरोजगार

नवी दिल्लीः लॉकडाऊनच्या एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२० या काळात देशातल्या २ कोटी १० लाख नोकरदारांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची आकडेवारी सेंटर फॉर मॉन

चीन-अमेरिका स्पर्धा आणि भारतापुढील संधी
एका वर्षात मुद्रा योजनेतील एनपीए झाले दुप्पट
पोलिस शौर्य पदकावरचे शेख अब्दुल्लांचे नाव हटवले

नवी दिल्लीः लॉकडाऊनच्या एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२० या काळात देशातल्या २ कोटी १० लाख नोकरदारांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची आकडेवारी सेंटर फॉर मॉनिटेरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)ने प्रसिद्ध केली आहे. या ३-४ महिन्यांपैकी गेल्या ऑगस्टमध्ये ३३ लाख व जुलैमध्ये ४८ लाख नोकरदारांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. बेरोजगारीची ही कुर्हाड केवळ नियमित वेतन मिळणार्यांवर, कमी पगार असलेल्यांवर पडलेली नसून औद्योगिक क्षेत्रात व बड्या कंपन्यातल्या मोठ्या पगारावर असलेल्यांनाही याचा फटका बसला आहे.

२०१९-२०मध्ये ऑगस्टमध्ये देशातील वेतनदारांची संख्या ८.६ कोटी होती ती संख्या आता ६.५ कोटी इतकी घसरली आहे.

सीएमआयईच्या नुसार जुलैमध्ये बेरोजगारीचा दर ७.४० टक्के होता तो ऑगस्टमध्ये वाढून ८.३५ टक्के झाला. यात ऑगस्टमध्ये शहरी बेरोजगारीची टक्केवारी ९.८३ टक्के व ग्रामीण भागात ७.६५ टक्के इतकी झाली.

मूळ बातमी

लेखाचे छायाचित्र प्रतीकात्मक

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: