प्रशासनाकडून ईव्हीएमची पळवापळवीः अखिलेशचा आरोप

प्रशासनाकडून ईव्हीएमची पळवापळवीः अखिलेशचा आरोप

लखनौः उ. प्रदेशासह ४ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी एक दिवसांवर आली असता समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राज्य प्रशासनाकडून वारा

हनुमान, भोंगा आणि महाभारत
पिगॅससः सरकारला नोटीस देण्याचा निर्णय १६ ऑगस्टला ठरणार
पर्रीकर, मॉंसेरात, पण गोव्याचं काय?

लखनौः उ. प्रदेशासह ४ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी एक दिवसांवर आली असता समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राज्य प्रशासनाकडून वाराणशी मतदारसंघात ईव्हीएम पळवले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी बरेली नगरपालिकेच्या गाडीतून तीन ईव्हीएम बॉक्स पळवले जात होते, आता ही चोरी सापडल्यावर अधिकारी सारवासारव करत असल्याचा आरोपही केला.

मंगळवारी अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप व उ. प्रदेश प्रशासनाकडून गैरप्रकार सुरू असल्याचे आरोप केले. भाजपचा पराभव अटळ असल्याने एका प्रशासकीय सचिव प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून भाजप जेथे हारत असेल तेथे मतमोजणी संथ गतीने करावी अशा सूचना देत असल्याचा आरोप यादव यांनी केला. गेल्या निवडणुकांत ४७ जागांवर केवळ ५०० मतांनी भाजपने आघाडी घेतल्याचे त्यांनी सांगितले. बनारसमध्ये ईव्हीएमचा एक ट्रक सापडला तर दोन ट्रक पळून गेले. बनारस दक्षिण व अयोध्येत सपा जिंकत असून त्याने भाजपमध्ये भय निर्माण झाले आहे. राज्यातल्या तरुणांना आता आपली मते वाचवावीत अशी माझी विनंती असल्याचे अखिलेश यादव म्हणाले. बनारसचे जिल्हाधिकारी बेईमानी करत आहेत, जनतेचा लोकशाहीवर विश्वास आहे, पण असे प्रकार पाहून त्यांच्यामध्ये संताप निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला. या विधानसभा निवडणुकांत सपा ३०० जागा घेऊन सत्तेवर येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सपाच्या आघाडीला भाजप घाबरली होती. त्यातून पंतप्रधानांकडून जिल्हावार सभा घेतल्या गेल्या. काल जे एक्झिट पोल दाखवले गेले त्यातून भाजप जिंकत असल्याची एक हवा निर्माण केली जात आहे. पण ही लढाई लोकशाही वाचवण्याची असून ही वेळ संकटाची आहे. त्यानंतर जनतेला क्रांती करण्याशिवाय पर्याय नाही, असेही अखिलेश यादव म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0