संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कस्टडी

संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कस्टडी

मुंबई :  मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने ४ दिवसांची ईडी कस्टडी दिली. ही कस्टडी ४ ऑगस्टपर्यंत देण्यात आली. राऊत यांची

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक
संजय राऊत यांचा फ्लॅट व अन्य संपत्ती ईडीकडून जप्त
अनिल देशमुख यांना अटक, ईडीची कारवाई

मुंबई :  मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने ४ दिवसांची ईडी कस्टडी दिली. ही कस्टडी ४ ऑगस्टपर्यंत देण्यात आली. राऊत यांची चौकशी सुरू असताना त्यांचे वकील उपस्थित राहू शकतील. न्या. एम. जी देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत हेच खरे लाभार्थी आहेत. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्यासाठी काम करायचे आणि त्यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये १ कोटी पाठवल्याचे आल्याचे ईडीतर्फे न्यायालयात सांगण्यात आले. मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात मोठ्या प्रमाणावर पैसे हेराफेरी झाल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले. संजय राऊत हे परदेशात गेले होते, याबद्दल माहिती घेत असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले.

अॅड. अशोक मुंदरगी यांनी संजय राऊत यांच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. अॅड. हितेन वेणेगावकर यांनी ईडीतर्फे युक्तीवाद केला.

अॅड. अशोक मुंदरगी म्हणाले, “ही राजकीय सूडापोटीची कारवाई आहे. संजय राऊत यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत, त्यातून त्यांना कायदेशीर पैसे मिळतात. ईडी राजकीय दबावातून कारवाई करत आहे. महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर ही कारवाई होत आहे.”

ईडीने रात्री साडेदहा वाजल्यानंतर चौकशी करणार नाही, असे न्यायालयात सांगितले. संजय राऊत यांचे वकील, सकाळी येऊ शकतात, असे ईडीने न्यायालयात सांगितले. ईडीने आठ दिवसांची कोठडी मागितली होती.

सकाळी संजय राऊत यांना जे. जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना दुपारच्या सत्रात न्या. एम. जी देशपांडे यांच्यासमोर न्यायालयात हजर करण्यात आले.

१७ तासांच्या ईडीच्या चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काल रात्री पावणे एक वाजता अटक केली होती.

दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी मुंबईतील भांडुप येथे संजय राऊत यांच्या ‘मैत्री’ या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी राऊत कुटुंबियांची भेट घेतली. ‘काळजी करू नका. शिवसेना आणि मी तुमच्याबरोबर आहोत, असे ठाकरे यांनी राऊत कुटुंबीयांना सांगितले.

खोटे पुरावे तयार करण्यात येत आहेत. राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. संजय राऊत झुकणार नाही. महाराष्ट्र कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर दिली होती.

२० जुलै आणि २७ जुलै रोजी असे दोनदा समन्स चुकवल्यानंतर ईडीचे तपासकर्ते काल सकाळी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या घरी पोहोचले. मुंबईतील चाळीच्या पुनर्विकासासंदर्भात एजन्सीला त्यांची चौकशी करायची आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले राऊत यांनी कोणत्याही भ्रष्टाचार केल्याचे नाकारले आहे आणि राजकीय सूडबुद्धीने त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे.

सक्तवसूली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी आज संजय राऊत यांच्या घरी मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी सकाळी साडेसात वाजता पोहोचले होते. राऊत यांच्या घराची तपासणी संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. राऊत यांनी जाताना गाडीतून उभे राहून शिवसैनिकांना लढण्याचा इशारा केला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: