‘लोकसभा’-‘राज्यसभा टीव्ही’चे एकत्रीकरण

‘लोकसभा’-‘राज्यसभा टीव्ही’चे एकत्रीकरण

नवी दिल्लीः लोकसभा व राज्यसभा टीव्ही या दोन वाहिन्यांना एकत्र करून संसद टीव्ही असे नामकरण करण्यात येणार आहे. संसद टीव्हीवरून दोन वाहिन्या दाखवल्या जाण

ब्रिटिशाने रिपब्लिकवर केलेला मानहानीचा दावा जिंकला
संभाषण खासगी व सुरक्षितः व्हॉट्सअपचा खुलासा
कोई सरहद ना इन्हें रोके…

नवी दिल्लीः लोकसभा व राज्यसभा टीव्ही या दोन वाहिन्यांना एकत्र करून संसद टीव्ही असे नामकरण करण्यात येणार आहे. संसद टीव्हीवरून दोन वाहिन्या दाखवल्या जाणार असून संसदेच्या अधिवेशनादरम्यान या वाहिन्यांवरून दोन सभागृहांचे थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार माजी आयएएस अधिकारी रवी कपूर यांना संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांचा कार्यकाल एक वर्षाचा किंवा पुढील आदेश निघेपर्यंत असेल.

राज्यसभा टीव्हीचे स्वामित्व हक्क व संचालन हे राज्यसभेकडून केले जात होते. या वाहिनीवर राज्यसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपणाबरोबर संसदीय कामकाजांची चर्चा व अन्य सामाजिक-आर्थिक-राजकीय विषयांची चर्चाही होत असे. २०११मध्ये राज्यसभा ही वाहिनी सुरू करण्यात आली होती.

लोकसभा टीव्हीवर भारत सरकारचे नियंत्रण असून ही वाहिनी सरकारी धोरणांची चर्चा करते. या वाहिनीवर लोकसभा सत्रांचे थेट प्रक्षेपणही केले जाते. तसेच जुने कार्यक्रमही दाखवले जातात. लोकसभा टीव्हीची सुरूवात १९८९मध्ये झाली होती पण त्याचे नामकरण २००४मध्ये देण्यात आले होते.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेचे अधिवेशन नसेल तेव्हा या दोन्ही वाहिन्यांवर अन्य कार्यक्रम दाखवले जाणार आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0