संस्कृत नसेल तर संगणक ‘क्रॅश’ – मंत्र्यांची मुक्ताफळे

संस्कृत नसेल तर संगणक ‘क्रॅश’ – मंत्र्यांची मुक्ताफळे

मुंबई : अणुचा शोध प्राचीन काळात चरक ऋषींनी लावला होता. संस्कृत ही जगातील एकमेव वैज्ञानिक भाषा असून संगणकासाठी संस्कृत भाषा सुयोग्य असल्याचे ‘नासा’चेही

दिल्लीत भाजप नेते धार्मिक भावना भडकवण्याच्या प्रयत्नात
कर्नाटकातल्या हिजाब प्रकरणाची सुनावणी आज होणार
राज्यपाल कोश्यारी नमले, माफी मागितली

मुंबई : अणुचा शोध प्राचीन काळात चरक ऋषींनी लावला होता. संस्कृत ही जगातील एकमेव वैज्ञानिक भाषा असून संगणकासाठी संस्कृत भाषा सुयोग्य असल्याचे ‘नासा’चेही मत आहे व ते त्यांनी मान्य केले आहे, अशी विधाने देशाचे मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आयआयटी मुंबईच्या ५७ व्या पदवीप्रदान समारंभात शनिवारी केली.

निशंक असेही म्हणाले की, भविष्यात जर संगणक बोलू लागले तर ते केवळ संस्कृत भाषेमुळे शक्य आहे. नाहीतर संगणक ‘क्रॅश’ होतील. कारण संस्कृत हीच संगणकाची भाषा आहे.

निशंक यांची आयआयटी पदवीप्रदान समारंभातील विज्ञान-तंत्रज्ञान संदर्भात एकापेक्षा एक हास्यास्पद विधाने ऐकल्याने उपस्थित प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांमध्येही चूळबूळ सुरू झाली. सगळेच जण अस्वस्थ झालेले दिसत होते.

निशंक यांनी आयुर्वेद औषधांबद्दलही चमत्कारिक विधाने केली. ते म्हणाले, आयुर्वेदाशिवाय जग अपूर्ण आहे. कोणत्याही रुग्णालयाची स्थापना आयुर्वेदाशिवाय अपूर्ण आहे कारण आयुर्वेदाशिवाय औषधेही अपूर्ण आहेत.

निशंक यांनी योग संदर्भातही एक दावा केला. ‘योगविद्येने मन व शरीर शांत होते व याचा अनुभव जगाने घ्यावा म्हणून आपले पंतप्रधान प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे जगातील १९९ देशांनी योगशिवाय कशाचेही अस्तित्व नाही अशी कबुली दिली आहे. आपल्याला सुरक्षित जगायचे असेल तर योगशिवाय पर्याय नाही’, असे ते म्हणाले.

निशंक यांनी शिक्षणाबरोबर संस्कार व संस्कृती जपण्याची आवश्यकता असल्याचे सांगत जेव्हा जगात लोकांना ज्ञानाची आस होती तेव्हा ते आपल्या देशात तक्षशिला व नालंदा येथे येत असतं. हा वारसा पाहून आपण वैश्विक विद्यापीठ म्हणून स्वत:ला जगापुढे ठेवले पाहिजे. हे उद्दिष्ट्य येत्या पाच वर्षांत आपण मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0