सौदी अरेबियात चाबकाने फटके मारण्याची शिक्षा बंद

सौदी अरेबियात चाबकाने फटके मारण्याची शिक्षा बंद

रियाध : सार्वजनिकरित्या दोषींना चाबकाने फटके मारण्याची शिक्षा सौदी अरेबियाच्या सर्वोच्च न्यायालयाने कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या व्यक

बेपत्ता परमबीर सिंग अखेर मुंबईत दाखल
वानखेडे यांची खाजगी फौज – मलिक
जूनमध्ये कृषी क्षेत्रात १ कोटी ३० लाख व्यक्ती बेरोजगार

रियाध : सार्वजनिकरित्या दोषींना चाबकाने फटके मारण्याची शिक्षा सौदी अरेबियाच्या सर्वोच्च न्यायालयाने कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या व्यक्तीला चाबकाने फटके मारण्याच्या शिक्षेविरोधात गेली कित्येक दशके जगभर विरोध होत आहे. विशेषत: इस्लामी जगतात विवाहबाह्य संबंध, सार्वजनिक पातळीवर शांततेचा भंग करणे व मानवी हत्या संदर्भात ही शिक्षा दिली जात असते. पण या शिक्षेच्या विरोधात जागोजागी मानवाधिकार संघटनांनी चळवळीच्या माध्यमातून विरोध चालवला होता. अखेर या संघटनांच्या चळवळीला यश आले असून सौदीच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दोषींना सार्वजनिक स्तरावर चाबकाने फटके मारण्याची शिक्षा बंद करताना आमचा हा निर्णय मानवाधिकार मापदंडांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. पण भविष्यात न्यायाधीशांनी आरोपींना दंड, तुरुंगवास किंवा सामाजिक सेवा यासारख्या शिक्षा द्याव्यात असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

६९ वर्षीय सामाजिक कार्यकर्ता अब्दुल्ला अल-हमीद यांना सौदी शासकांच्याविरोधात आवाज उठवणे, राष्ट्रीय सुरक्षिततेचा भंग करणे व अन्य आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले होते पण या आरोपांच्या विरोधात मानवाधिकार संघटना अमन्सेटीने आवाज उठवला होता. काही दिवसांपूर्वीच अब्दुल्ला अल-हमीद यांचे हृदविकाराच्या झटक्याने तुरुंगात निधन झाले होते, त्यानंतर चाबकाने फटके मारण्याच्या शिक्षेसंदर्भात चर्चा सुरू झाली होती. सौदी सरकारवर मानवाधिकाराचा भंग केल्याचा आरोप होऊन आंतरराष्ट्रीय समुदायाकडून टीका व दबाव आणला जात होता.

२०१४मध्ये इस्लाम धर्माचा अवमान केल्याप्रकरणात सौदी ब्लॉगर रायफ बदावी या व्यक्तीला १० वर्षे तुरुंगवास व १ हजार चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. या रायफ बदावी यांचा २०१३मध्ये युरोपिय संसदेने साखारॉव मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0