एसबीआयचे अधिकारी निष्ठुर व अकार्यक्षम : सीतारामन

एसबीआयचे अधिकारी निष्ठुर व अकार्यक्षम : सीतारामन

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक इंडिया व त्यात काम करणारे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी हे कमालीचे निष्ठुर व अकार्यक्षम असल्य

विळखा ड्रॅगनच्या बँकेचा
लक्ष्मी विलास बँकेवरही रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
सारस्वत बँकेच्या थकबाकीदारांची नावे उघड करण्यास स्थगिती

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक इंडिया व त्यात काम करणारे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी हे कमालीचे निष्ठुर व अकार्यक्षम असल्याचा ठपका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका बैठकीत ठेवला. आसाममधील सुमारे अडीच लाख चहा कामगारांची स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अद्याप खाती सुरू झालेली नाहीत. त्यासंदर्भात बँक अधिकाऱ्यांनी २७ फेब्रुवारी रोजी गोहाटीत आयोजित केलेल्या एका बैठकीत चिडलेल्या अर्थंमत्र्यांनी एसबीआयच्या अध्यक्षांसोबत अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या बैठकीची एक ध्वनीफित सोशल मीडियावर दोन दिवसांपूर्वी पसरली, यात निर्मला सीतारामन एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांना झापत असल्याचे ध्वनीत होते.

आसाममधल्या चहा कामगारांची खाती लवकरात लवकर सुरू करावीत, माझ्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नका. तुम्ही मला दिल्लीत येऊन थेट भेटा. हा विषय मी संपवणार नाही, अशा शब्दांत निर्मला सीतारामन या रजनीश कुमार यांना झापत होत्या. हे काम न करून तुम्ही अकार्यक्षमपणा दाखवला आहे व या संपूर्ण अपयशाची जबाबदारी तुमची आहे, या संदर्भात मी तुमच्याशी विस्ताराने चर्चा करेन. पण चहा कामगारांचे नुकसान होऊ नये यासाठी तुमच्या कुणाच्या जिद्दीची पर्वा करणार नाही, असे त्या रजनीश कुमार यांना सुनावताना दिसतात.

या बैठकीत रिझर्व्ह बँकेने वेळेत मंजुरी न दिल्याने चहा कामगारांची खाती काढता येत नसल्याचा मुद्दा रजनीश कुमार यांनी उपस्थित केला आणि ही खाती आठवडाभरात लगेच काढता येतील असे रजनीश कुमार सांगत होते. पण त्यांच्या या म्हणण्यावर तीव्र नापसंती अर्थमंत्र्यांकडून दर्शवली जात होती.

या बैठकीत आसामचे अर्थमंत्री हिमंता बिस्वा सरमा हेही उपस्थित होते.

बँक कर्मचाऱ्यांकडून पहिले टीका व नंतर पत्रक मागे

अर्थमंत्र्यांनी एसबीआयवर ज्या शब्दांत टीका केली आहे, त्यावर ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन (एआयबीओसी) तीव्र नाराजी प्रकट केली असून अर्थमंत्र्यांनी बँक अध्यक्षांना व कर्मचाऱ्यांना निष्ठुर व अकार्यक्षम म्हणणे हा बँकेचा अपमान आहे, असा आरोप बँक कर्मचारी संघटनेने केला आहे. या आरोपाचे पत्रक बँक संघटनेने १३ मार्च रोजी जाहीर केले होते पण नंतर ते लगेच मागे घेतले गेले.

एआयबीओसी संघटनेचे देशभरात सुमारे ३ लाख २० हजार कर्मचारी सदस्य आहेत. लोकप्रतिनिधींनी बँक अधिकाऱ्यांशी अशा पद्धतीने वर्तन करणे चुकीचे असून ज्या पद्धतीने या बैठकीतील वृत्तांत सोशल मीडियात प्रसिद्ध झाला आहे, त्याची चौकशी केली जावी अशी मागणी या बँक संघटनेने केली आहे.

पण १३ मार्च रोजी जारी झालेल्या या पत्रकावर आसामच्या अर्थमंत्र्यांनी १४ मार्च रोजी टीका करत अर्थमंत्र्यांच्या धैर्याचे कौतुक केले आणि त्यानंतर १५ मार्चला दुपारी १२.०४ वाजता निर्मला सीतारामन यांनी बँक कर्मचाऱ्यांनी आपले पत्रक मागे घेतल्याची माहिती ट्विटवरून दिली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: