‘007 जेम्स बाँड’: शॉन कॉनरी यांचे निधन

‘007 जेम्स बाँड’: शॉन कॉनरी यांचे निधन

लंडनः केवळ रुपेरी पडदाच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यात सभ्य, मार्दव, आनंदी व आधुनिक अशी प्रतिमा असलेले व ‘007 जेम्स बाँड’ हे ब्रिटिश गुप्तहेराचे काल्पनिक

राज्याकडून व्हॅटमध्ये कपात; पेट्रोल-डिझेलचे दर उतरले
माणूस झाला छोटा, निसर्ग झाला मोठा!
मालदीव: बेकायदा करारांमध्ये भारतीय उद्योजकांचा सहभाग?

लंडनः केवळ रुपेरी पडदाच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यात सभ्य, मार्दव, आनंदी व आधुनिक अशी प्रतिमा असलेले व ‘007 जेम्स बाँड’ हे ब्रिटिश गुप्तहेराचे काल्पनिक व पुढे अजरामर झालेले पात्र जन्मास घालणारे शॉन कॉनरी यांचे शनिवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. सुमारे ४ दशकाहून अधिक काळ त्यांची रुपेरी पडद्यावरील कारकीर्द बहारली होती. जेम्स बाँड या काल्पनिक ब्रिटिश गुप्तहेराची भूमिका असलेल्या पहिल्या सिनेमात- ‘डॉ. नो’ -पासून त्यांनी काम सुरू केले आणि चित्रपट जगताला एक देखणा, तरणाबांड, मादक, आनंदी व साहसी असा कलावंत मिळाला.

शॉन कॉनरी यांचा जन्म एडिनबर्ग येथील एका झोपडपट्टीत झाला. मृतपेट्यांना पॉलिश करणे, घरोघरी दूध पोहचवणे व समुद्रात लाइफगार्ड म्हणून काम करणार्या कॉनरी यांना व्यायामाची आवड होती. त्यांच्या बळकट शरीरयष्टीमुळे ते चित्रपट क्षेत्राकडे वळाले. त्यांनी ब्रिटिश रॉयल नेव्हीमध्ये तीन वर्षे कामही केले होते.

१९६२मध्ये कादंबरीकार इआन फ्लेमिंग यांच्या कलाकृतीवर ‘007 जेम्स बाँड’ हे पात्र असलेल्या ‘डॉ. नो’ या चित्रपटातून कॉनरी यांची कारकीर्द सुरू झाली. इआन फ्लेमिंग यांनी उभे केलेले जेम्स बाँडचे पात्र अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होते. हा ब्रिटिश एजंट धीरगंभीर होता पण तो विनोदी, मिश्किल स्वभावाचाही होता. सुंदर, मादक स्त्रियांना सहज आपल्या जाळ्यात ओढण्यापासून अशा स्त्रियांच्या कटकारस्थानाला बळी पडणारा, जगाला संकटात घालू पाहणार्या दुष्टशक्तींचे निर्दालन करणारा, सतत आधुनिक गॅजेट्सचा ध्यास असलेल्या, आपला जीव सतत धोक्यात घालणारे हे पात्र होते. त्याचबरोबर हे पात्र म्हणजे शीतयुद्धाचा पाश्चात्य जगताचा एक नायक होता. हा नायक कम्युनिझमच्या विरोधात प्राणाची बाजी लावून लढणारा सैनिक होता. त्याचबरोबर तो खुल्या जगाचा पुरस्कर्ता, आधुनिकता, बदलते तंत्रज्ञान यांना आत्मसात करणारा होता.

कॉनरी यांनी फ्लेमिंग यांच्या बाँडच्या सर्व स्वभाव वैशिष्ट्यांना पडद्यावर साकारल्याने बाँड या पात्राची एक चौकट निश्चित झाली. ही चौकट पुढे आलेल्या बाँडपटांमध्ये अन्य अभिनेत्यांना मोडताही आली नाही. ‘डॉ. नो’मध्ये आपले नाव सांगताना श़ॉन कॉनरी यांचे ‘My Name is Bond, James Bond’ हे वाक्यही अजरामर ठरले. ‘डॉ. नो’ या सिनेमाने जेम्स बाँड हे पात्र रातोरात जगप्रसिद्ध झाले. पुढे रुपेरी पडद्यावर आलेले हे जादूई व्यक्तिमत्व जगाला वेड लावणारे ठरले. उंच, तरणाबांड, घोगरा आवाज, थोडेसे तुसडे व्यक्तिमत्व यामुळे शॉन कॉनरी यांची ब्रिटिश व हॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख तयार झाली.

कॉनरी यांचे ‘फ्रॉम रशिया विथ लव्ह’ (१९६३), ‘गोल्डफिंगर’ (१९६४), ‘थंडरबॉल’ (१९६५), ‘यू ओन्ली लिव्ह ट्वाइस’ (१९६७) हे बाँडपट प्रचंड गाजले. १९६९मध्ये मात्र त्यांनी या पात्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व त्यांच्या जागी ऑस्ट्रेलियाचा अभिनेता जॉर्ज लॅझेनबी याने ‘ऑन हर मॅजेस्टीस सिक्रेट सर्व्हिस’ (१९६९) या चित्रपटात जेम्स बाँड साकारला. पण शॉन कॉनरी यांची बाँड म्हणून जेवढी लोकप्रियता जगभर तयार झाली होती ती नव्या कलाकाराला मिळाली नाही. त्यामुळे १९७१मध्ये चित्रपट निर्माते अल्बर्ट ब्रोकोली यांच्या आग्रहाखातर कॉनरी यांना ‘डायमंड्स आर फॉरेव्हर’ हा चित्रपटात पुन्हा बाँड साकारावा लागला. हा आपला अखेरचा बाँडपट असेल असे ते म्हणत होते पण बाँड साकारणारा कलाकार सापडत नसल्याने वयाच्या ५३ व्या वर्षी कॉनरी यांनी ‘नेवर से नेवर अगेन’ (१९८३) हा आणखी एक बाँडपट केला. त्यानंतर मात्र आपण पुन्हा हे पात्र साकारणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

बाँडचे पात्र साकारणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता असे त्यांनी १९८३मध्ये एका मुलाखतीत सांगितले. नयनरम्य स्थळं, मोहक वातावरणनिर्मिती, चांगल्या कथा, मनाला भावणारी अशी कथेतील पात्रे, हेरगिरी, कटकारस्थान, अतिसुंदर असे सेट व सुंदर पक्ष्यांसोबत काम करणे हा अविस्मरणीय अनुभव होता, असे ते म्हणतं.

वयाच्या ५९व्या वर्षी १९८९मध्ये त्यांना ‘पीपल्स मॅगझीन’ने या जगातला ‘सेक्सिस्ट मॅन’ असा गौरव केला.

स्कॉटिश जनतेचा अद्भूत नायक

इआन फ्लेमिंग यांच्या अन्य बाँडपेक्षा कॉनरी यांनी साकारलेला बाँड वेगळाच होता. तो अजिंक्य होता, त्याला सामाजिक जाणीवा होत्या, तो बाँडला आवडणारी मार्टिनी न पिता बिअर प्यायचा. कॉनरी यांनी आपले मूळचे स्कॉटिश उच्चार बाँड साकारताना बदलले नाहीत. त्यामुळे कॉनरी यांचा बाँड स्कॉटिश सांस्कृतिक वारशाचा एक भाग झाला. स्कॉटलंडशी नाते त्यांनी अखेरपर्यंत जपले. आपल्या अखेरच्या आयुष्यापर्यंत ते स्वतंत्र स्कॉटलंड चळवळीचे समर्थक होते. ‘स्कॉटलंड फॉरएव्हर’ हे शब्द त्यांनी आपल्या हातावर गोंदून घेतले होते. वयाच्या ६९व्या वर्षी त्यांना ‘ब्रिटनच्या राणी एलिझाबेझ यांच्या हस्ते नाइटहूड’ पुरस्कार देण्यात आला तेव्हा कॉनरी यांनी खास स्कॉटिश वेष परिधान केला होता. या कार्यक्रमात हातावर त्यांनी गोंदलेले वाक्य जगाने पाहिले होते.

जेम्स बाँडच्या व्यतिरिक्त शॉन कॉनरी यांनी अन्य चित्रपटातही काम केले. ‘द अनटचेबल’ (१९८९) या चित्रपटातल्या पोलिस अधिकार्याच्या भूमिकेबद्दल त्यांना प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.

बाँडपटाव्यतिरिक्त त्यांनी केलेले अल्फ्रेड हिचकॉकचा ‘मर्नी’ (१९६४), ‘द विंड अँड द लायन’ (१९७५), जॉन ह्युस्टन यांचा ‘द मॅन हू वूड बी किंग’ (१९७५), स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित ‘इंडियाना जोन्स अँड द लास्ट क्रुसेड’ (१९८९), ‘द हंट फॉर रेड ऑक्टोबर’ (१९९०) हे चित्रपट लोकप्रिय झाले.

समांतर चित्रपटातही त्यांनी आपल्या अभिनयाचे कसब दाखवले होते. ‘झार्दोज’ (१९७४) हा त्यांचा चित्रपट सर्वोत्तम मानला जातो.

२००३मध्ये एका चित्रपट निर्मात्याशी वाद झाल्यानंतर त्यांनी चित्रपट विश्वाचा संन्यास घेतला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: