भारत-पाक तणाव संबंधांत यूएईची मध्यस्थी

भारत-पाक तणाव संबंधांत यूएईची मध्यस्थी

दुबईः भारत-पाकिस्तानातील तणाव निवळून उभय देशांतील संबंध शांततामय व सदृढ व्हावेत, यासाठी संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्यस्थी करत असल्याची माहिती उघडकीस

काश्मीरप्रश्नी ट्रम्प पुन्हा मध्यस्थीस तयार
कोविड-१९ : भू-राजकीय संघर्षाचे भय
आहे खरे जरी काही, परि तू जागा चुकलासि

दुबईः भारत-पाकिस्तानातील तणाव निवळून उभय देशांतील संबंध शांततामय व सदृढ व्हावेत, यासाठी संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्यस्थी करत असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

गेल्या जानेवारी महिन्यात दुबईमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये एक गुप्त बैठक झाली होती, या बैठकीत उभय देशांमधील तणाव कमी करण्याविषयी चर्चा झाल्याचे अमेरिकेतील यूएईचे राजदूत युसेफ अल ओतैबा यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील हूवर संस्थेत झालेल्या एका दूरश्राव्य बैठकीत सांगितले. या बैठकीत गेल्या दोन-तीन वर्षांत काश्मीर मुद्द्यावरून निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी उभय देशांमध्ये राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित करणे व हे संबंध सुदृढ पातळीवर आणण्यासाठी प्रयत्न करणे. तसेच भारत-पाकिस्तानमध्ये मैत्री होईल की नाही यापेक्षा या देशांमध्ये राजनैतिक पातळीवर संबंध तरी पूर्ववत होण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचा महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला, असे ओतैबा यांनी सांगितले.

ओतैबा यांनी अफगाणिस्तानातून अमेरिका आपले संपूर्ण सैन्य मागे घेणार असल्याच्या निर्णयावर चिंता प्रकट केली. अमेरिकेचे सैन्य माघारी आल्यास अफगाणिस्तानातील ‘अशांतता माजवणार्या शक्ती’ पुन्हा उफाळून येतील व त्याने अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियांना बाधा येईल. असे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून अफगाणिस्तान सरकार, तालिबान व अमेरिका यांच्यात अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याविषयी सहमती होणे गरजेचे असून अफगाणिस्तानाच्या स्थैर्याची जबाबदारी पाकिस्तानवर अधिक आहे, असेही ते म्हणाले.

अफगाणिस्तानासंदर्भात येत्या २४ एप्रिल ते ४ मे दरम्यान तुर्कीमध्ये बैठक होत आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0