नेहरु जयंतीला लोकसभा अध्यक्ष, उपराष्ट्रपती, मंत्री अनुपस्थित

नेहरु जयंतीला लोकसभा अध्यक्ष, उपराष्ट्रपती, मंत्री अनुपस्थित

नवी दिल्लीः देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते व देशाचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आयोजित संसदेतील कार्यक्रमाला लोकसभ

बनावट टुलकिटः नड्डा, इराणींविरोधात काँग्रेसची तक्रार
विरोधकांचा अभाव असता…
शाह फैजल यांना अटक, काश्मीरमध्ये नजरकैद

नवी दिल्लीः देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते व देशाचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आयोजित संसदेतील कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू व सर्व केंद्रीय मंत्री अनुपस्थित होते. घटनात्मक पदावरील व्यक्ती व केंद्रीय मंत्र्यांच्या या अनुपस्थितीबद्दल काँग्रेसने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

संसदेच्या प्रथेनुसार दिवंगत पंतप्रधान, राष्ट्रपती, भारताच्या राजकारणातील अध्वर्यू नेते यांच्या जयंती, पुण्यतिथीला सेंट्रल ह़ॉलमध्ये लावलेल्या तसबिरीला फुले वाहून अभिवादन केले जाते. या कार्यक्रमाला घटनात्मक पदावरील व्यक्ती व केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी, अन्य पक्षाच्या राजकीय नेत्यांनी उपस्थित राहणे ही कित्येक वर्षांची प्रथा व परंपरा झाली आहे. पण रविवारी नेहरुंच्या जयंतीला लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व मंत्रिमंडळातील एकही मंत्री उपस्थित नव्हता. केवळ लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योग खात्याचे राज्यमंत्री भानू प्रताप सिंह वर्मा उपस्थित होते. तर विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राज्य सभेतील प्रमुख विरोधी काँग्रेसचे नेते मलिक्कार्जुन खारगे व अन्य काही पक्षांचे काही खासदार उपस्थित होते.

सरकारमधील मंत्री व घटनात्मक पदावरील व्यक्तींच्या या अनुपस्थितीवरून काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक ट्विट करत, ज्यांच्या तसबिरीमुळे संसदेच्या सेंट्रल ह़ॉलचे वैभव खुलते, त्या नेत्याच्या जयंतीच्या पारंपरिक कार्यक्रमाला लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती अनुपस्थित राहतात. एकही मंत्री उपस्थित असतो, हा निर्दयपणा नाही का, असा सवाल केला.

तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनीही सरकारकडून झालेल्या या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. ‘संसदेच्या सेंट्रल हॉलमधील आजचे दृश्य पाहून मला काही आश्चर्य वाटले नाही. हे सरकार एके दिवशी संसदेसहित भारतातील महान संस्थांना नष्ट करत जाणार’ असल्याचे ट्विट त्यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: