ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची पुण्यात चाचणी सुरू

ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची पुण्यात चाचणी सुरू

नवी दिल्लीः सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया व ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली बहुचर्चित कोविड-१९वरील ‘कोविडशील्ड’ लशीची दुसर्या टप्प्यातल्या मानवी चाच

भारताचा जीडीपी १.६ टक्के : गोल्डमॅन सॅशचा अंदाज
लॉकडाऊन -४ मध्येही बुडाला पारंपरिक मच्छिमार
टोक्यो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलले

नवी दिल्लीः सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया व ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली बहुचर्चित कोविड-१९वरील ‘कोविडशील्ड’ लशीची दुसर्या टप्प्यातल्या मानवी चाचणीस पुण्यात मंगळवारी सुरूवात झाली. बुधवारी पुण्यातील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज व रुग्णालयात ही दुसरी चाचणी कोरोनाबाधित दोन रुग्णांवर सुरू झाली. बुधवारी एक वाजता ही लस या दोन रुग्णांना देण्यात आली असून एक रुग्ण ३२ वर्षाचा असून त्याची कोविड-१९ व अँटिबॉडी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना ही लस देण्यात आल्याचे भारती विद्यापीठ रुग्णालयाचे संचालक डॉ. संजय लालवानी यांनी सांगितले. दुसरा रुग्ण ४८ वर्षांचा पुरुष असून त्यांनाही ही लस देण्यात आली आहे.

या दोन रुग्णांना आता २८ दिवसानंतर दुसरी लस देण्यात येणार आहे.

या रुग्णालयात पाच कोरोनाबाधित रुग्णांवर दुसरी चाचणी घेण्यात येणार होती. त्यानुसार या सर्वांची कोविड-१९ व अँटिबॉडी चाचणी करण्यात आली. त्यापैकी तीन रुग्णांचे अँटिबॉडी चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याने ते चाचणी देण्यास अयोग्य ठरले.

या रुग्णालयाकडून येत्या ७ दिवसांत २५ जणांना लस देण्यात येणार आहे. ज्यांच्यावर चाचणी घेण्यात येणार आहे, त्यातील रुग्णांचा वयोगट १८ ते ९९ इतका निश्चित करण्यात आला आहे. त्याचबरोबर या रुग्णालयात ३०० ते ३५० कोरोनाबाधित रुग्णांवर लसीची दुसरी चाचणी घेण्यात येणार आहे.

पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटने ब्रिटिश स्वीडिश औषध कंपनी एस्ट्राजेन्का कंपनीच्या सहकार्याने ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेन्नर इन्स्टिट्यूट द्वारा विकसित लसीच्या उत्पादनाबाबत करार केला आहे. ही लस भारतात कोविडशील्ड नावाने ओळखली जाईल व १ अब्ज लशींचे उत्पादन केले जाईल.

भारतातील कोरोनाबाधित रुग्णांवर दुसर्या व तिसर्या मानवी चाचणीत १६०० रुग्ण घेणार असून दुसर्या चाचणीत देशात १०० वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना रुग्णांना लस देण्यात येणार आहे. दुसर्या चाचणीचे निष्कर्ष आल्यानंतर त्याचा १० दिवस अभ्यास करण्यात येईल व त्यानंतर १५०० कोरोना रुग्णांवर तिसरी चाचणी घेण्यात येणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0