पुण्यात ओमायक्रॉनचे ७ रुग्ण

पुण्यात ओमायक्रॉनचे ७ रुग्ण

नवी दिल्लीः महाराष्ट्रात पुणे शहरात ओमायक्रॉन या कोविड-१९ विषाणूच्या नव्या प्रकाराचे ७ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर देशात ओमायक्रॉनचे एकूण

कोविडमुळे बालविवाहही वाढण्याची भीती
आपले प्रजासत्ताक आणि त्यांचे रिपब्लिक
पंजाब, हरयाणात जिओचे ग्राहक घटले

नवी दिल्लीः महाराष्ट्रात पुणे शहरात ओमायक्रॉन या कोविड-१९ विषाणूच्या नव्या प्रकाराचे ७ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर देशात ओमायक्रॉनचे एकूण २१ रुग्णांची नोंद झाली आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ४४ वर्षांची भारतीय वंशाची नायजेरियाची महिला व तिच्या दोन मुली २४ नोव्हेंबरला लागोस येथून पुण्यात आल्या होत्या. या महिलेचा भाऊ पुणेनजिक पिंपरी चिंचवड येथे असून त्याला भेटण्यासाठी तिघे आले होते. या तिघांमुळे तिच्या भावाला व त्याच्या दोन मुलींना ओमायक्रॉन या नव्या कोविड-१९ विषाणू प्रकारचा संसर्ग झाला. या सहा जणांपैकी नायजेरियाच्या महिलेच्या शरीरात कोविडची अत्यंत कमी लक्षणे आढळली असून उर्वरित पाच जणांमध्ये कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. या ६ जणांपैकी ३ प्रौढांनी कोविडचे दोन डोस घेतले असून अन्य दोघांनी कोविशिल्ड व अन्य एकाने कोवॅक्सिनचा एक डोस घेतला आहे.

या ६ जणांव्यतिरिक्त फिनलंडमधून आलेल्या एका ४७ वर्षांच्या पुण्याच्या नागरिकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. ही व्यक्ती नोव्हेंबर अखेरीस भारतात आली होती. या व्यक्तीचे कोविशिल्डचे दोन डोस झाले आहेत.

राजस्थानात एका कुटुंबातील ९ जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. हे कुटुंब द. आफ्रिकेतून नुकतेच परत आले होते.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: