शाहीन बागेत जय श्रीरामच्या घोषणा

शाहीन बागेत जय श्रीरामच्या घोषणा

नवी दिल्ली : वादग्रस्त नागरिक दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शाहीन बागेत रस्त्यावर बसलेल्या आंदोलकांना विरोध करण्यासाठी त्याच परिसरातील स्थानिक नागरिकां

तबलिगी आणि कोरोना उद्रेक- काही अनुत्तरित प्रश्न
शेतकरी आंदोलनः बैठक निष्फळ, ९ डिसेंबरला पुन्हा चर्चा
आमच्याकडे जन्मदाखला नाही- केजरीवाल

नवी दिल्ली : वादग्रस्त नागरिक दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शाहीन बागेत रस्त्यावर बसलेल्या आंदोलकांना विरोध करण्यासाठी त्याच परिसरातील स्थानिक नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. शाहीन बागेतील आंदोलक गेले ५० दिवस रस्त्यावर बसल्याने नाॅयडा ते कालिंदी कुंज हा मार्ग बंद झाला आहे. हा रस्ता बंद झाल्याने या परिसरातील स्थानिकांची मोठी गैरसोय होत असून आंदोलक हटत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रविवारी आंदोलनाला बसण्याचा निर्णय घेतला. यावेळी काही लोकांनी जय श्रीराम, वंदे मातरम, खाली करो शाहीन बाग वालेंको अशा घोषणा दिल्या. या नागरिकांनी पोलिसांनी बॅरिकेड काढून रस्ता वाहतुकीसाठी रिकामा करावा अशीही जोरदार मागणी केली आहे. पोलिसांनी यावेळी ५२ जणांना ताब्यात घेतले पण त्यांची नंतर सुटका केली.
शाहीन बागेत दोन परस्परविरोधी गटांनी धरणे धरल्यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला असून पोलिस तडजोडीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिल्ली पोलिस उपायुक्त देवेश श्रीवास्तव यांनी सांगितले .
बहुसंख्य नागरिकांनी कालिंदी कुंज व नाॅयडा रस्ता बंद झाल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्रार केली आहे. पोलिस या प्रकरणात फारसे प्रयत्न करत नाही. त्यांनीही बॅरिकेड लावून सर्वांचीची कोंडी केली आहे असे नागरिक आरोप करत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: