नवी दिल्ली : पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेतील सध्याचे सदस्य रथीन रॉय व शमिका रवी यांच्या जागी साजिद चिनॉय व अशिमा गोयल या दोन नव्या सदस्यांची नियुक
नवी दिल्ली : पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेतील सध्याचे सदस्य रथीन रॉय व शमिका रवी यांच्या जागी साजिद चिनॉय व अशिमा गोयल या दोन नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रथीन रॉय व शमिका रवी हे दोन सदस्य दोन वर्षांकरिता आर्थिक सल्लागार परिषदेसाठी काम करत होते. नवी नियुक्ती झालेले साजिद चिनॉय हे जेपी मॉर्गन या संस्थेचे तर अशिमा गोयल इंदिरा गाधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च या संस्थेशी निगडीत आहेत. बुधवारी सरकारने या नावांची घोषणा केली. दर दोन वर्षांनी आर्थिक सल्लागार परिषदेची पुनर्रचना केली जाते, त्या अंतर्गत हे नवे सदस्य आहेत.
बिबेक डेब्रॉय हे पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे संचालक तर रतन वताल हे या परिषदेचे एक सदस्य म्हणून कायम ठेवण्यात आले आहेत.
रथीन रॉय व शमिका रवी यांच्या जागी नवे सदस्य का नेमले याचा खुलासा मात्र सरकारने केलेला नाही. रथीन रॉय यांनी सरकारच्या वित्तीय धोरणावर टीका केली होती. त्यांनी ओव्हरसीज सॉव्हरिन बाँडबद्दलही आक्षेप घेतले होते. तर शमिका रवी यांनी भारताला सध्याची भेडसावणारी मंदी अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बाबींमुळे असल्याचे मत व्यक्त केले होते. अर्थव्यवस्थेची सगळी सूत्रे अर्थखात्याकडे ठेवणे म्हणजे एखाद्या वेगाने वाढणाऱ्या संस्थेचा कारभार अकाउंट विभागाकडे ठेवण्यासारखा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले होते.
रथीन रॉय व शमिका रॉय या दोन माजी सदस्यांनी बेरोजगारी, वित्तीय तूट, घटता आर्थिक विकासदर, उद्योगधंदे व पायाभूत सोयी यांच्यासंदर्भात आपले अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे सोपवले होते. पण हे अहवाल आजपर्यंत जाहीर करण्यात आलेले नाहीत.
मूळ बातमी
COMMENTS